शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bangladesh Pollution: त्यामुळे बांगलादेश बनला जगातील सर्वात प्रदूषित देश, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 10:24 AM

1 / 5
बांगलादेश जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. एका स्विस संस्थेच्या आयक्यू सर्व्हेनंतर हा दावा करण्यात आला आहे. हा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांवर ११७ देशांच्या ६४७५ शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनंतर बांगलादेश जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये कसा गेला, याची धक्कादायक कारणं समोर आली आहेत.
2 / 5
द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार प्रदुषणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे जे मानदंड आहेत. त्यापेक्षा बांगलादेशमधील प्रदूषण हे १५ पटीने अधिक आहे. येथील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण हे वाहने, विटभट्ट्या आणि कारखान्यांमधून निघणारा धूर ही आहेत. त्याशिवाय शहरांमधून उडणारी धूळसुद्धा प्रदूषणाचं मोठं कारण आहे.
3 / 5
हवेतील प्रदूषणाचं कारण ठरणारे बारीक कण पीएम२.५ असतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार हवेमध्ये हे कण ५ µg/m3 पेक्षा अधिक असता कामा नयेत. मात्र बांगलादेशमध्ये हे प्रमाण ७६.९ मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर(µg/m3) आहे. हवेमध्ये असलेल्या या कणांचे प्रमाण वाढत चालले आहे.
4 / 5
आरोग्य संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार दिल्लीनंतर ढाका जगातील दुसरी सर्वात प्रदूषित राजधानी आहे. दिल्लीमध्ये पीएम२.५ चा स्तर ८५.० µg/m3 आणि ढाकामध्ये हा आकडा ७८.१ µg/m3 आहे. गेल्या वर्षीसुद्धा प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश पहिल्या स्थानावर होता.
5 / 5
रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये प्रदूषणाचा स्तर वाढल्यामुळे चेस्ट इन्फेक्शनचा धोका वाढला आहे. त्याशिवाय इंफ्लूएंजा, निमोनिया, फुप्फुसांचा कर्करोग यांचा धोका वाढला आहे. तसेच मुलांमध्येही प्रदूषणाचा परिणाम दिसून येत आहे.
टॅग्स :Bangladeshबांगलादेशpollutionप्रदूषणInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य