तुम्हीही जास्तवेळ गरम पाण्याने अंघोळ करता? चांगल्या आरोग्यासाठी हिवाळ्यात टाळा 'या' १० चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 01:20 PM2020-11-23T13:20:34+5:302020-11-23T13:38:59+5:30

वातावरणात बदल होताच शरीराच्या गरजासुद्धा बदलतात. थंडीच्या वातावरणात फ्लू किंवा इतर इंफेक्शन्सचा सामाना करावा लागतो. या इन्फेक्शनपासून बचावासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवणं गरजेचं आहे. हिवाळ्याच्या वातावरणात लोकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला त्वचेसह, शरीराची काळजी घेण्यासाठी काही 'विंटर टिप्स' सांगणार आहोत.

जास्त कपडे वापरणं: हिवाळ्याच्या वातावरणात त्वचा गरम ठेवण्याची गरज असते. पण जास्त गरम कपडे वापरल्यानं शरीरात ओव्हर हिटींग होऊ शकतं. थंडी वाजल्यानंतर इम्यून सिस्टम व्हाइट ब्लड सेल्स (WBC) चे उत्पादन करते. त्यामुळे इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून लांब राहता येते. जर शरीर ओव्हर हिटींग झाले तर इम्यून सिस्टीम आपले काम योग्य पद्धतीने करू शकत नाही.

झोपण्याआधी काय कराल: एका संशोधनानुसार रात्री झोपण्याआधी हात पायांना गोव्हज आणि सॉक्सने कव्हर करणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. तुमची झोप सुधारण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

जास्त वेळ गरम पाण्याने अंघोळ करणं: तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्याच्या वातावरणात जास्त गरम पाण्याने अंघोळ करणं नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे शरीरावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो. गरम पाण्यामुळे केराटीन नावाच्या त्वचेच्या पेशी खराब होतात. त्यामुळे त्वचेवर खाज येणं, सुकलेले त्वचा होणं, रॅशेज येणं असा त्रास उद्भवतो.

बेडटाईम रूटीन: हिवाळ्याच्या वातावरणात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. अशा स्थितीत सिर्काडियन सायकल डिस्टर्ब होते. त्यामुळे सतत सुस्ती येते. दिवसभरात कधीही झोपण्यापेक्षा रात्री लवकर झोपण्याची सवय लावून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

जास्त खाणं- हिवाळ्याच्या वातावरणात अनेकांना जास्त भूक लागते. म्हणून कसलाही विचार न करता प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. वजन वाढू द्यायचं नसेल तर फायबर, प्रोटिन्स असलेल्या भाज्या आणि फळांचे सेवन करायला हवे. बाहेरचे फॅटफूल अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे बंद करायला हवं.

कॅफीन: हिवाळ्यात चहा, कॉफीचे लोक जास्त प्रमाणात सेवन करतात. कॅफीनचे अति प्रमाणात सेवन करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. शरीरातील साखरेची पातळी वाढून लठ्ठपणा, डायबिटीस, जास्त झोप येणं, रक्तदाबासंबंधी इतर समस्या उद्भवण्याचा धोका असू शकतो. म्हणून दिवसभरातून २ कपपेक्षा जास्त कॉफी किंवा चहाचे सेवन करू नका.

घरात बसून राहणं: हिवाळ्याच्या वातावरणात लोक थंडीपासून वाचण्यासाठी घराच्या बाहेर पडणं टाळतात. असं करणं महागात पडू शकतं. घरी बसून वजन वाढण्याची शक्यता असते. याशिवाय सुर्यप्रकाश योग्य प्रमाणात न मिळाल्यास व्हिटामीन डी ची कमतरता भासते. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. सध्या कोरोनासारख्या जीवघेण्या आजारांपासून बचाव करायचा असेल तर शरीरात पुरेश्या प्रमाणात व्हिटामीन डी असणं गरजेचं असते.

व्यायाम: हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. सतत आळसावलेले राहण्यापेक्षा रोज व्यायाम करून शरीर चांगले ठेवा. तुम्हाला जीमला जाण्यासाठी कंटाळा येत असेल तर घरच्याघरी योगा, सोपे व्यायामप्रकार करू शकता.

हिवाळ्याच्या वातावरणात लोकांना खोकला, सर्दी, ताप अशा समस्या उद्भवतात. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःचं उपचार करणं चुकीचं ठरू शकतं. म्हणून कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.(Image Credit- Getty Images)