कोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:40 PM2020-05-26T14:40:06+5:302020-05-26T15:03:03+5:30

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न केले जात आहेत. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी नियमांचे पालन करण्यात आले नाही तर कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढू शकतो. माहामारीच्या स्थितीत लोकांच्या मनात भीती असताना कोरोना विषाणूंबाबत WHO ने धोक्याची सुचना दिली आहे

डब्ल्यूएचओच्या इमरजेंन्सी प्रोग्रामचे प्रमुख डॉक्टर माइक रियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, जग आता कोरोना व्हायरसच्या माहामारीच्या मधल्या टप्प्यात आहे. कोरोना रुग्णांची संख्या अनेक देशांमध्ये कमी होत आहे. पण सेंट्रल साऊथ अमेरिका आणि साऊथ आशिया तसंच अमेरिकेतील धोका वाढत चालला आहे.

डॉ. रियान यांनी सांगितले की, माहामारी टप्प्या टप्प्याने येत असून या वर्षाच्या शेवटापर्यंत ही माहामारी कमी होऊ शकते. कोरोना व्हायरसबाबत सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या भागात कोरोना जास्त काळ टिकू शकला नाही तर त्याच भागात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा वेग जास्त वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचं संक्रमण कोणत्याही वेळी अचानक वाढू शकतं. त्यामुळे संक्रमणाचं प्रमाण कमी झाल्यानंतर अनुमान लावलं जाऊ शकतं नाही . कारण कधीही कोरोनाची दुसरी लाट वेगाने आकम्रक करू शकते.

युरोप आणि उत्तर अमेरिकेने एक व्यापक दृष्टीकोन ठेवत व्यापक जनहीत, सामाजिक उपाययोजना आणि टेस्टिंग करण्याचं प्रमाण वाढवायला हवं. जेणेकरून कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या कमी करून माहामारीचा प्रसार कमी होईल.

युरोपिन देश आणि अमेरिकेत मागील काही आठवड्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला आहे. अशा स्थितीमुळे अनेक देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परीणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले

सध्याच्या स्थितीत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जगभरातून ५० लाखापेक्षा जास्त आहे. तर जगभरातील मृतांचा आकडा तीन लाखांपेक्षा जास्त आहे.

Read in English