शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आरोग्य जपायचंय?; तुमच्या किचनमधून काढून टाका 'या' ७ वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 3:32 PM

1 / 7
प्लास्टिकची बाटली- प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बिस्फेनॉल ए हा घटक असतो. दररोज प्लास्टिकच्या बाटलीचा वापर केल्यास रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. याशिवाय स्थूलत्वदेखील वाढतं. त्याऐवजी काचेची बाटली वापरा.
2 / 7
रिफाईन्ड तेल- तेल रिफाईन्ड होत असताना मोठ्या प्रमाणात ऍसिडचा वापर होतो. तेलाला येणारा वास काढून टाकण्यासाठी हेक्सानॉलचा वापर होतो. तेल गरम केलं जात असताना त्यामधून फॅट्स निघतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका असतो. त्याऐवजी मोहरीच्या तेलाचा वापर करा.
3 / 7
नॉन स्टिक कूकवेअर- जवळपास ९० टक्के घरांमध्ये नॉन स्टिक तव्यांचा वापर होतो. जास्त तापमानावर या तव्यांचा वापर केल्यास पीएफसी कोटिंगला धक्का बसतो. कोटिंगचे तुकडे पोटात गेल्यास यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. त्याऐवजी लोखंडी भांडी वापरा.
4 / 7
अ‍ॅल्युमिनियम फॉईल- माणसाच्या शरीरात जास्तीत जास्त ५० मिलीग्रॅम अ‍ॅल्युमिनियम गेल्यास धोका नसतो. मात्र दररोज अ‍ॅल्युमिनियम फॉईलमधील पदार्थ खाल्ल्यानं २ ते ५ ग्रॅम अ‍ॅल्युमिनियम फॉईल पोटात जातं. यामुळे मेंदूवर आणि हाडांवर परिणाम होतो. त्याऐवजी बटर पेपरचा वापर करा.
5 / 7
तुटलेली भांडी- अनेकदा आपला आवडता मग, कप फुटतो. पण आवडता असल्यानं आपण तो फेकून देत नाही. असे कप, मग व्यवस्थित स्वच्छ होत नाही. त्यात किटाणू राहतात. त्यामुळे असे कप, मग किंवा भांडी वापरु नका. त्याऐवजी नवं भांडं खरेदी करा.
6 / 7
प्लास्टिक चॉपिंग बोर्ड- ओल्या प्लास्टिक चॉपिंग बोर्डवर किटाणू असतात. त्यामुळे पोटाचे आजार होण्याचा धोका असतो. याशिवाय प्लास्टिकदेखील शरीरात जातं. त्याऐवजी लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरा.
7 / 7
अ‍ॅल्युमिनियमची भांडी- अ‍ॅल्युमिनियमला स्लो पॉयझन म्हटलं जातं. त्यामुळेच ब्रिटिश काळात तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरली जायची. अ‍ॅल्युमिनियमचा वापर दैनंदिन जीवनात केल्यास किडनी आणि फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स