By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:58 IST
1 / 6लॉस एंजलिस येथे सुरू असलेल्या एका ऐतिहासिक खटल्यात वादी पक्षाच्या वकिलांनी सोशल मीडियाची तुलना कॅसिनो आणि नशेच्या औषधांशी करताना हा सोशल मीडिया मुलांच्या मेंदूला मुद्दाम याचे व्यसन लावत असल्याचा दावा केला.2 / 6या खटल्यात मेटा व गुगलची इन्स्टाग्राम तसेच यु-ट्यूबसारखी माध्यमे लहान मुलांच्या मानसिक नुकसानीस जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लहान मुलांनी तासनतास या मीडियाशी चिकटून राहावे अशा प्रकारे या माध्यमांची रचना करण्यात आली असल्याचा दावा वकील मार्क लॅनिअर यांनी केला.3 / 6वकील लॅनिअर यांनी याच्याशी संबंधित दोन्ही कंपन्यांचे अंतर्गत ई-मेल आणि दस्तऐवज न्यायालयात मांडले. यात 'मेटा'चा एक संशोधनात्मक अहवालाचाही समावेश आहे. या अभ्यासानुसार, मानसिक तणावाचे आघात सोसलेली मुले सोशल मीडियाच्या व्यसनाच्या लवकर आहारी जातात. यात आई-वडिलांनी कितीही लक्ष दिले तरी त्याचा फार परिणाम होत नाही.4 / 6'मेटा'चे वकील पॉल श्मिट यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या मुलीच्या मानसिक अनारोग्यामागे कौटुंबिक तणाव, भावनिक अडचणी व शाळेतील वाईट अनुभव ही कारणे असल्याचे वकिलांनी नमूद केले. एकाही डॉक्टरने या तरुणीस सोशल मीडियाचे व्यसन जडलेली रुग्ण मानले नसल्याचेही हे वकील म्हणाले.5 / 6या प्रकरणाच्या केंद्रस्थानी 'केजीएम' या आद्याक्षरांनी नावाची सुरुवात होणारी तरुणी आहे. सुनावणीतून जे काही मुद्दे समोर येतील या आधारे याच प्रकारचे खटले चालवण्यास मदत होणार आहे. या खटल्यात न्यायालयाने तरुणीसह इतर दोन वादींनाही निवडले आहे.6 / 6सध्या २० वर्षाच्या असलेल्या एका तरुणीने वयाच्या सहाव्या वर्षी यू-ट्यूब आणि नवव्या वर्षी इन्स्टाग्रामचा वापर सुरू केला. इतक्या कमी वयात सोशल मीडियावर रमलेल्या या मुलीच्या मानसिक आरोग्यावर हळूहळू वाईट परिणाम झाला. त्याविषयी ही प्रकरण न्यायालयात सुरू आहे.