शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दातांसाठी 'या' गोष्टी ठरू शकतात घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 4:15 PM

1 / 6
पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. यामुळे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच सौंदर्यातही भर पडते. मात्र काही गोष्टी या दातांसाठी घातक ठरू शकतात
2 / 6
लहान असतान दात किडले अथवा खराब झाले की ते आपोओप पडून जातात. मात्र मोठं झाल्यावर असं करता येत नाही. दातांची समस्या असल्यास ती खूप त्रासदायक ठरते.
3 / 6
काही लोकांना बर्फ खायला आवडतो. मात्र जास्त बर्फ खाल्ल्यास दातांना त्रास होतो. त्यामुळे दातांचे नुकसान होते.
4 / 6
अनेकांना दाताने झाकण उघडण्याची तसेच एखादी प्लॉस्टिकचं रॅपर असलेला पदार्थ दाताने फोडण्याची सवय असते. मात्र असं करू नका कारण असं करताना दात तुटण्याची शक्यता ही अधिक असते.
5 / 6
सकाळी दात घासताना डोळ्यावर थोडी झोप असल्याने काही जण खूप वेळ दात घासतात. तर काहींना ते जोरजोरात घासण्याची सवय असते. पण यामुळे दात कमजोर होतात.
6 / 6
काम करताना अनेकांना पेन्सिल अथवा पेन चावण्याची सवय असते. मात्र यामुळे दातांना इजा होण्याची शक्यता ही अधिक असते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स