या ‘बेरीज’आरोग्यासाठी घातक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:40 IST2019-08-13T14:34:43+5:302019-08-13T14:40:32+5:30

बेरीज (Berries) तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वानाच आवडते. मात्र, बेरीज अनेक प्रकारच्या असतात. काही बेरीज आरोग्यासाठी लाभदायक असतात. तर काही बेरीज आरोग्यासाठी घातक असतात. अशाच काही घातक बेरीज आपण पाहूया....
Poke Berries : या बेरीज प्रामुख्याने मुलांच्या आरोग्यासाठी घातक असतात.
Holly Berries : या बेरीजची झाडे शक्यतो घाणीच्या ठिकाणी असतात. या बेरीज खाल्यामुळे डायरिया, डिहायड्रेशन, उल्टी होण्याचा त्रास होऊ शकतो.
Daphne Berries : या बेरीज खाल्याने पोट दुखी, उल्टी आणि डायरिया होण्याची शक्यता असते.
Horse Nettle : या बेरीज खाल्यामुळे डायरिया, उल्टी, गळ्यात खाज, ताप आणि डोकेदुखी या सारख्या समस्या उद्भवतात.
Elderberries : जोपर्यंत या बेरीज योग्य पिकल्या जात नाहीत, तोपर्यंत खाऊ नये. नाहीतर यामुळे उल्टी, डायरियाचा त्रास होऊ शकतो.
Yew Berries : या बेरीज खाल्याने ओठ निळे होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच, डायरिया, डोकेदुखी, हार्टबीट वाढण्याची शक्यता आहे.
Privet Berries : या बेरीज खाल्यामुळे पोट दुखी, उल्टी, डोके दुखी, थंडी आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
Snowberries : जर या बेरीज प्रमाणापेक्षा जास्त खाल्या तर उल्टी आणि डायरिया होऊ शकतो.