दुधाचेही शरीरावर साइड इफेक्ट होतात का? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 09:40 AM2021-01-28T09:40:12+5:302021-01-28T09:53:31+5:30

त्यांचं मत आहे की, दुधाला एका सुपरफूडसारखं बघणं योग्य नाही. ते म्हणतात की, दूध पिणं शरीरासाठी फायदेशीर आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त दूध प्यायल्याने शरीराला नुकसानही होतात.

दुधाचं सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. कारण दुधात शरीराला आवश्यक असे कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशिअमसहीत अनेक पोषक तत्वे असतात. दुधाकडे नेहमीच चांगलं आरोग्य, शक्ती आणि शारीरिक विकासासोबत जोडून पाहिलं जातं. हाडे मजबूत करण्यासाठीही दूध महत्वाचं मानलं जातं.

मात्र, काही तज्ज्ञांचं यावर एकमत नाही. त्यांचं मत आहे की, दुधाला एका सुपरफूडसारखं बघणं योग्य नाही. ते म्हणतात की, दूध पिणं शरीरासाठी फायदेशीर आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त दूध प्यायल्याने शरीराला नुकसानही होतात.

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड प्रिव्हेंशन सेंटरचे प्रोफेसर आणि न्यूट्रिशन संशोधक क्रिस्टोफर गार्डनर यांनी डिस्कवर मॅगझिनला सांगितले की, 'डेअरी प्रॉडक्टमध्ये कोणतेही असे अनोखे पोषक तत्व नाहीत जे कोणत्याही दुसऱ्या पदार्थात मिळत नाहीत. हे खरं आहे की, दुधाच्या माध्यमातून कॅल्शिअम सहजपणे मिळवता येतं. पण आणखीही काही पदार्थ आहेत ज्यातून तुम्ही कॅल्शिअम मिळवू शकता'.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, मजबूत हाडांसाठी दूध एखाद्या जादूच्या गोळीसारखं नाही. ज्या देशांमध्ये दुधाचं सर्वात जास्त सेवन केलं जातं तिथेही फ्रॅक्चरच्या केसेस जास्त समोर येतात. याचा अर्थ हा होतो की, केवळ दूध किंवा जास्त पाणी प्यायल्याने हाडांवर कोणताही खास परिणाम होत नाही. दुधाशिवाय आणखीही काही पदार्थ हाडे मजबूत करतात'.

या रिसर्चचे लेखक लुडविग म्हणाले की, उंची वाढवण्यासोबतच फ्रॅक्चरचा धोका वाढू लागतो. संशोधकांचं मत आहे की, दुधात अनेक प्रकारचे पोषक तत्वे आढळतात. पण हे पोषक तत्वे इतरही अनेक पदार्थांमधून मिळवले जाऊ शकतात'.

काही लोकांना दुधापासून अॅलर्जी असते ज्याला लॅक्टोज इनटॉलरेन्स असं म्हटलं जातं. असे लोक डेअरी प्रॉडक्टमध्ये असलेले लॅक्टोज पचवू शकत नाहीत. आणि दूध प्यायल्यावर यांना पोट फुगणे किंवा पोटात दुखणे अशा समस्या होतात.

रिसर्चनुसार, जगातील साधारण ६५ टक्के लोकांना लॅक्टोजची समस्या आहे. बाजारात लॅक्टोज फ्री दूध मिळतं. पण एक्सपर्ट या लोकांना डाएटमध्ये सोया प्रॉडक्ट्स आणि कॅल्शिअमचे इतर स्त्रोत जसे की, ऑरेंज ज्यूस, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करण्यास सांगतात.

हेल्थ एक्सपर्टचं मत आहे की, दुधाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने गंभीर आजार वाढू शकतात. खासकरून गायीचं दूध पिताना खूप काळजी घ्यावी लागते.

रिसर्चचे लेखक विल्लेट आणि लुडविग यांना त्यांच्या रिसर्चच्या समिक्षेत आढळून आलं की, डेअरी प्रॉडक्टच्या अधिक वापराने पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि महिलांमध्ये एंडोमेट्रिअल कॅन्सरचा धोका वाढतो. मात्र, यावर आणखी रिसर्च करण्याची गरज आहे.

फूल क्रीम दुधात सॅच्युरेटेड फॅट आणि सोडिअमचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही वस्तू हृदय आणि ब्लड प्रेशरसाठी चांगल्या मानल्या जात नाहीत. संशोधकांनी त्याऐवजी लो-फॅट दूध पिण्याचा आणि इतर पोषक तत्व मिळवण्यासाठी दुसरे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे.