शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शरीरातील रक्त कमी झालंय, मग या फळांचं करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 6:40 PM

1 / 6
बीट - रक्तातील हिमोग्लोबिन आणि लोहाचं स्तर वाढवण्यासाठी बीट आरोग्यासाठी सर्वात उत्तम असे फळ आहे. बीटमध्ये आरोग्यास पोषक अशी तत्त्वं आहेत. यामध्ये लोह, फायबर आणि पॉटेशिअमचं प्रमाण अधिक आहे. बीट खाल्ल्यानं रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यास मदत होते.
2 / 6
सफरचंद - दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सफरचंद या फळामध्ये लोहाचं प्रमाणात प्रचंड असते. यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शिवाय, पोटाच्या समस्याही दूर होतात.
3 / 6
डाळिंब रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्याचं काम करते. डाळिंबाचं नियमित सेवन केल्यास हिमोग्लोबिनसंबंधीच्या समस्या कमी होतात. डाळिंबमध्ये आर्यन आणि कॅल्शिअम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबरसारखे तत्त्वं आहेत.
4 / 6
लीची फळाला आरोग्यवर्धक फळ म्हटले जाते. लीचीच्या सेवनामुळे रक्त पेशी वाढण्यास मदत होते आणि पचन प्रक्रियादेखील सुधारते.
5 / 6
आवळ्यामध्ये 'व्हिटॅमिन C'चं प्रमाण अधिक असते. शरीरातील रक्त कमी झाले असल्यास ही समस्या आवळ्याचे सेवन केल्यास कमी होते.
6 / 6
हिरव्या भाज्यांमध्ये विशेषतः पालक आणि मेथीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. शरीरातील रक्त वाढवावे यासाठी आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करावा.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स