सतत डोक्यात फिरणारे विचार कसे थांबवायचे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:40 IST2026-01-25T14:32:33+5:302026-01-25T14:40:28+5:30
Thoughts: आपण जागेपणी घालवलेल्या वेळेच्या जवळपास ५० टक्के वेळ आपण आत्ताच्या क्षणाशी काहीही संबंध नसलेल्या विचारांमध्ये घालवतो. आपण जगत असतो वर्तमानात, पण मन अडकलेलं असतं भूतकाळात किंवा भविष्यकाळात. या फेऱ्यातून बाहेर पडता येतं... त्यासाठी काय करावं... ते वाचा...

आपण जागेपणी घालवलेल्या वेळेच्या जवळपास ५० टक्के वेळ आपण आत्ताच्या क्षणाशी काहीही संबंध नसलेल्या विचारांमध्ये घालवतो. आपण जगत असतो वर्तमानात, पण मन अडकलेलं असतं भूतकाळात किंवा भविष्यकाळात. या फेऱ्यातून बाहेर पडता येतं... त्यासाठी काय करावं... ते वाचा..

तुम्ही या फेऱ्यात अडकला आहात का?
एका विषयावरून लक्ष हटत नाही. भीती, राग, दुःख यांचा अतिरेक होतो. जुने प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतात. भविष्यातील सगळ्यात वाईट शक्यता डोळ्यांसमोर येत राहते. स्वतःच्या चुका, उणिवांभोवती फिरत राहिले जाते. उत्तर 'हो' असेल, तर थांबा, यावर मार्ग आहे.

स्वतःच्या विचारांवरच प्रश्न उपस्थित करा
प्रत्येक विचार योग्य असतोच, असं नाही. स्वतःला विचारा की हा विचार मला उपयोगी आहे का? तो तथ्यांवर आधारित आहे का? हाच प्रश्न माझ्या एखाद्या मित्राने विचारला असता, मी त्याला काय सांगितलं असतं?

याकडे पाहण्याचा दुसरा मार्ग काय असेल?
विचारांची चौकट बदला. नकारात्मक विचार हटवता येत नाहीत. पण त्यांची धार कमी करता येते. चुकांकडे अपयश म्हणून नाही, तर शिकण्याची संधी म्हणून पाहा. अतिशय टोकाच्या निष्कर्षांऐवजी संतुलित विचार करा. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा.

बोलून मोकळं व्हा विश्वासू व्यक्तीशी बोला
मनातलं बाहेर आलं, की ओझं हलकं होतं. विचार येतात... जातात. मनावरचा ताबा परत मिळवता येतो. त्यासाठी लागते सातत्य, संयम, स्वतःवरील प्रेम. नकारात्मक विचारांना सोडा आणि सध्या काय महत्त्वाचं त्याचा विचार करा.

विचार येणं थांबवता येत नाही. पण त्यांच्यामागे ओढत जाणं थांबवता येतं. मनावरचा ताबा परत मिळवणं हे रोजची छोटी, जाणीवपूर्वक पावलं आहेत. आज एक पाऊल टाका. उद्या मन तुमच्या बाजूने उभं राहील.याकडे पाहण्याचा दुसरा मार्ग काय असेल? विचारांची चौकट बदला. नकारात्मक विचार हटवता येत नाहीत. पण त्यांची धार कमी करता येते. चुकांकडे अपयश म्हणून नाही, तर शिकण्याची संधी म्हणून पाहा. अतिशय टोकाच्या निष्कर्षांऐवजी संतुलित विचार करा. प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा.

















