By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:10 IST
1 / 8मानवी आरोग्यात प्रथिनांचे महत्व - प्रथिने शरीराच्या वाढीसाठी व उतकांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. स्नायू, त्वचा, केस आणि हार्मोन्ससाठी महत्त्वाचे घटक तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीतही महत्त्वाचे योगदान आहे.2 / 8बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन सेवनाचे प्रमाण वाढले - जीम करणाऱ्यांमध्ये हाय-प्रोटीन डाएटचा ट्रेंड आहे. स्नायू लवकर वाढवण्यासाठी जास्त प्रथिनांचा वापर होत आहे. सोशल मीडिया आणि फिटनेस इन्फ्लुएन्सरचा प्रभाव आहे. तसेच नैसर्गिक आहाराऐवजी सप्लिमेंट्सकडे झुकाव दिवसेंदिवस वाढत आहे.3 / 8प्रोटीन पावडर, प्रोटीन शेकचा अतिवापर - गरजेपेक्षा जास्त प्रोटीन पावडर सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच डॉक्टरांचा सल्ला न घेता देखील अशी पावडर घेतली जात आहे. त्यामुळे काही सप्लिमेंट्समध्ये स्टेरॉइड्स किंवा हानिकारक घटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे याचे दुष्परिणाम वाढतात.4 / 8उर्वरित शरीरालाही काय अपाय ? - पचन बिघडते, गॅस, बद्धकोष्ठता, डिहायड्रेशन, लिव्हरवरही ताण येतो. वजनात असंतुलित वाढ किंवा फॅट जमा होणे.5 / 8ही लक्षणे दिसताच सावध व्हा - सतत थकवा, लघवीचे प्रमाण किंवा रंग बदलणे, हात-पाय, चेहऱ्यावर सुज येणे, पोटदुखी, उलट्या, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे.6 / 8प्रथिनांसाठी उत्तम पर्याय कुठले? - शाकाहारी, डाळी, कडधान्ये, मूग, हरभरा, मसूर, दूध, दही, पनीर, सोयाबीन, टोफू, सुकामेवा बदाम, अक्रोड खावे. मर्यादित प्रमाणात अंडी, चिकन, मासे हे खावे.7 / 8किडनीवर काय होतो परिणाम? - जास्त प्रथिनांमुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो. युरिया व क्रिएटिनिनचे प्रमाण वाढते, किडनी फंक्शन कमी होण्याचा धोका निर्माण होतो. किडनी आजार असणाऱ्यांसाठी अधिक धोकादायक आहे.8 / 8आहारतज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला घ्या - आपल्या शरीराच्या गरजेनुसारच प्रथिनांचे सेवन करा, सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच नियमित तपासणी करून घ्या, संतुलित आहार आणि व्यायाम यालाच प्राधान्य देणे गरजेचे.