Heart Blockage: शरीरात दिसल्या या समस्या, तर व्हा सावध, असू शकतो हार्टमध्ये ब्लॉकेज, कधीही दुर्लक्ष करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 03:52 PM2022-11-25T15:52:03+5:302022-11-25T15:59:10+5:30

Heart Blockage: गेल्या काही काळामध्ये हार्टच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय संख्येने वाढले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे बनले आहे. हृदयात काही समस्या असल्या तर त्याची लक्षणे शरीरामध्ये दिसतात. त्यामुळे शरीरामध्ये काही समस्या दिसल्या तर वेळीच खबरदारी घ्या.

गेल्या काही काळामध्ये हार्टच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय संख्येने वाढले आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे बनले आहे. हृदयात काही समस्या असल्या तर त्याची लक्षणे शरीरामध्ये दिसतात. त्यामुळे शरीरामध्ये काही समस्या दिसल्या तर वेळीच खबरदारी घ्या.

हार्टमध्ये ब्लॉकेज झाल्यास चक्कर येणे सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत डोकं फिरत आहे असं वाटत. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

सर्वसाधारणपणे आपलं हृदय हे एका मिनिटामध्ये ७० ते १०० वेळा धडधडते. मात्र जर हेच हार्टबिट ४० पेक्षा कमी झाल्यास शरीरामध्ये रक्त आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यानंतर थवा आणि शुद्ध हरपल्यासारखे होते. कारण शरीराला जी उर्जा हवी असते ती मिळत नाही.

स्पष्टच आहे ते म्हणजेह हार्टबिट सामान्यापेक्षा कमी झाले तर श्वास घेण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत रुग्ण खूप घाबरतो. त्यामुळे लवकरात लवकर रुग्णालयात नेऊन उपचार करणे आवश्यक ठरते. अन्यथा रुग्णाची प्रकृती बिघडू शकते.

हृदयाच्या बहुतांश आजारामध्ये छातीत दुखणे हे सर्वसामान्य लक्षण आहे. त्याचं कारण ब्लॉकेज होणं हे असू शकतं. जर तुम्हाला अशा मेडिकल कंडिशनचा सामना करावा लागला तर घाबरू नका. तर संयम बाळगा आणि त्वरित कार्डियोलॉजिस्टशी संपर्क साधा.

जेव्हा तुमच्या हार्टबिटचा रेट योग्य नसतो आणि तुमच्या बॉडीला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा तुम्हाला फिजिकल अॅक्टिव्हिटमध्ये अडचणी येतात. या परिस्थितीत सामान्य व्यायामही करू शकत नाही. (ही माहिती घरगुती उपाय आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठल्याही समस्येबाबत तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या)