Health Tips: मानसिक तणावानं ग्रासले आहात?, तर मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 02:55 PM2018-04-25T14:55:50+5:302018-04-25T15:00:13+5:30

आपला प्राधान्यक्रम ठरवा : करिअर, यश, प्रगतीशिवाय तुमच्या आसपास तुमच्यावर प्रेम करणारे व्यक्तीदेखील असतात. यश संपादन करण्याच्या धावपळीत बऱ्याचदा तुमचे या माणसांकडे दुर्लक्ष होतं. त्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, त्यांच्यासोबत एखाद्या सहलीचेही तुम्ही नियोजन करू शकता.

मित्रमैत्रिणींसोबत संवाद साधण्यासाठी वेळ काढा : आयुष्यात मैत्री फार महत्त्वाची गोष्ट आहे. आयुष्यात होणारे बदल, नैराश्य, सुख-दुःख यासहीत अन्य गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात तुम्हाला तणावातून मुक्तता मिळते. मात्र नेहमी स्वतःबाबत बोलणी न करता, मित्रमैत्रिणीचीही मन की बात ऐका.

व्यायाम करा : व्यायाम करणं केवळ शरीरासाठीच नाही तर , तणाव दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करा, योगासने करा.

छंद जोपासा : जर तुम्हाला लिखाणीचा आवड आहे किंवा चित्रकला, संगीताची आवड आहे तर जास्तीत जास्त वेळ स्वतःचे छंद जोपासण्यासाठीही द्या. तुमचे हे छंद कदाचित व्यावसायिक पातळीवरदेखील बदलू शकतात.