शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्या किचनमधील हे पदार्थ आहेत विषारी, खात असाल तर जरा जपून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 3:44 PM

1 / 5
बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र स्वयंपाक घरात ठेवलेले बदाम जुने झाले असतील तर त्यांना थोडासा कडवटपणा येतो. जुने झालेले बदाम आरोग्यासाठी विषसमान असतात. हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण वाढल्यानं बदामात कडवटपणा येतो.
2 / 5
झटपट भाजी करावयाची असल्यास सर्वांची बटाट्याला पसंती असते. मात्र बटाटेदेखील बरेच दिवस ठेवल्यानं त्यांना मोड येतात. यामध्ये विष निर्माण होते. त्यामुळे मोड आलेले बटाट्यांचं सेवन करू नये.
3 / 5
मधमाशांच्या पोळ्यातील मध बऱ्याच जणांना खाणे पसंत असते. मात्र हे मध आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण यामध्ये छोटे-छोटे जीव-जंतू असतात. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यातील मधाचे सेवन केल्यास उलट्यांचा त्रास, चक्कर येणे यांसारखा त्रास उद्भवू शकतो.
4 / 5
काही फळं आपण बियांसहीत खातो. मात्र सफरचंद, प्लम सारख्या फळांच्या बीमध्ये हायड्रोजन सायनाईडचे प्रमाण अधिक असते. यास प्रोसीयिक अॅसिड म्हटले जाते. मात्र चुकूनही या फळांच्या बियांचे सेवन करू नये, कारण आरोग्यासंबंधीत गंभीर तक्रारी निर्माण होऊ शकतात.
5 / 5
जायफळ हे औषधी गुणांनी युक्त असे आहे. आयुर्वेदात यास प्रचंड महत्त्व आहे. मात्र आवश्यक मात्रेहून अधिक सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरू शकते. अधिक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकार, कमकुवतपणा, यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स