सर्वात मोठा खुलासा - वैज्ञानिकांनी शोधला कोरोनाच्या म्यूटेशनचा पॅटर्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 11:02 AM2021-02-05T11:02:09+5:302021-02-05T11:11:37+5:30

कोरोना व्हायरस आणि मनुष्याच्या शरीराच्या इम्युनिटीमध्ये मांजर-उंदरांचा खेळ होत आहे. वैज्ञानिक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरस सतत आपलं रूप बदलत आहे. अशातच वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनचा पॅटर्न शोधून काढला आहे. याने वैज्ञानिकांना हे समजून आलं आहे की, कशाप्रकारे रोगप्रतिकारक शक्तीतून विकसीत अॅंटीबॉडीजपासून वाचत आहे.

या रिसर्चमधून भविष्यात हे समजेल की, कोरोना व्हायरस कशाप्रकारे वर्तमानातील सर्व वॅक्सीन आणि उपचार पद्धतींपासून आपला बचाव करत आहे.

पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या वैज्ञानिंकानी याचा शोध लावला आहे की,कोरोना व्हायरस आपल्या जेनेटिक सिक्वेंसच्या त्या भागाला डिलीट करत आहे. म्हणजे नष्ट करत आहे ज्याच्यामुळे त्याचा बाहेरील थर म्हणजे स्पाइक प्रोटीनचा शेप बदलतो.

कोरोना व्हायरसच्या बाहेरील काटेदार भागाला स्पाइक प्रोटीन म्हटलं जातं. हे शरीराच्या कोशिकांमध्ये जाऊन चिकटतात. याचे काटे कोशिकांच्या बाहेरील थराला भेदून व्हायरसच्या आतील जीनोमला कोशिकांच्या आत सोडतात. यानंतर व्हायरस शरीरात असलेल्या अॅंटीबॉडीसोबत संघर्ष करतो किंवा स्वत:ला विकसीत करून आणखी व्हायरस निर्माण करतो.

हा रिसर्च सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी स्पाइक प्रोटीनचे १.५० लाख जीन सिक्वेंस जमा केले. हे सिक्वेंस जगभरातून जमा करण्यात आले होते. जेव्हा यावर अभ्यास करण्यात आला तेव्हा समोर आलं की, अनेक व्हेरिएंट डिलिशन म्यूटेशन करत आहे. म्हणजे आपल्या जेनेटिक सिक्वेंसच्या त्या भागाला डिलीट करत आहे ज्याने बाहेरील थर तयार होतो.

रिसर्च केल्यावर समोर आलं की, व्हायरस ज्याप्रकारे वॅक्सीन आणि अॅंटीबॉडीजपासून स्वत:ला वाचवतात किंवा चकमा देतात ती फार सेलेक्टिव प्रोसेस आहे.

जगभरातील सिक्वेंसचा अभ्यास केल्यावर वैज्ञानिकांना असं आढळलं की, साधारण ९ व्हेरिएंट असे आहेत जे जगभरातील कोरोना रूग्णांसाठी आजही चिंतेचा विषय आहेत.

या रिसर्चमधून एक मोठी बाब समोर आली आहे की, कोरोना व्हायरसचे म्यूटेशन असलेले रूप फार घातक आहेत. हे कोणत्याही वॅक्सीन आणि अॅंटीबॉडीच्या न्यूट्रीलायजिंग कॅपेसिटी म्हणजे हल्ला करण्याच्या शक्तीतून स्वत:ला वाचवतात. जर एखाद्या रूग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर आणि ७४ दिवसांपासून संक्रमित असेल र त्याचा मृत्यू होऊ शकतो. म्हणजे व्हायरसपासून वाचण्याचा कोणताही उपाय नाही.

कोरोना व्हायरस आणि मनुष्याच्या शरीराच्या इम्युनिटीमध्ये मांजर-उंदरांचा खेळ होत आहे. वैज्ञानिक हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता कुठे हे समजून आलं आहे की, कोरोना व्हायरस कशाप्रकारे स्वत:ला बदलत आहे. तो कसा स्वत:ला म्यूटेट करत आहे. याचे काही बदल फार चिंताजनक आणि घातक आहेत.

हा रिसर्च करणारे यूनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे वैज्ञानिक केविन मॅक्कार्थी म्हणाले की, सध्या यूके आणि साउथ आफ्रिकेतील व्हेरिएंट फार चिंताजनक आहे. हे रूप फार घातक आहे. हे एक इवोल्यूशन आहे पण फार वेगाने होत आहे. जर हा असाच बदलत राहिला तर जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टरांना सतत नवनवीन वॅक्सीन आणि उपचाराच्या पद्धती शोधाव्या लागतील.