coronavirus : काय आहे रॅपिड अ‍ॅंटीबॉडी टेस्ट आणि कशी केली जाते? जाणून घ्या याचा काय होणार फायदा....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 12:13 PM2020-04-07T12:13:19+5:302020-04-07T12:30:06+5:30

coronavirus : जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्हायरसची शिकार होते तेव्हा त्यांच्या शरीरात त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अ‍ॅंटीबॉडीज तयार होते.

कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतातही दररोज कोरोनाची लागण झालेल्यांची आकडेवारी वाढत आहे. जगभरात 13.4 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर 73 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ICMR ने एक नोटिफिकेशन जारी केलं होतं, ज्यानुसार रॅपिड अॅंटीबॉडी टेस्ट (Rapid Antibody Test) सुरू केली जाणार आहे. याची किट भारतात मिळणार आहे. आशा आहे की, 8 एप्रिलला ICMR ला 7 लाख किट मिळतील. पण लोकांमध्ये याबाबत कन्फ्यूजन झालं आहे. चला जाणून घेऊ काय आहे ही किट..

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्हायरसची शिकार होते तेव्हा त्यांच्या शरीरात त्या व्हायरससोबत लढण्यासाठी अॅंटीबॉडीज तयार होते. रॅपिड टेस्टमध्येही अॅंटीबॉडीजची माहिती मिळवली जाऊ शकते. या टेस्टला रॅपिड टेस्ट म्हटलं जातं कारण याचा रिझल्ट फारच लवकर मिळतो. केवल 15 ते 20 मिनिटात याचा रिझल्ट मिळतो.

यात व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेऊन अॅंटीबॉडी टेस्ट किंवा सीरोलॉजिकल म्हणजे सीरमशी संबंधित टेस्ट केल्या जातात. यासाठी व्यक्तीच्या बोटातून केवळ एक किंवा दोन थेंब रक्त घेतलं जातं. यातून समोर येतं की, आपल्या इम्यून सिस्टीमने व्हायरससोबत लढण्यासाठी अॅंटीबॉडीज तयार केले की नाही.

अशात ज्या लोकांना कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याची लक्षणे दिसत नाहीत, त्याना कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती सहजपणे मिळवता येऊ शकेल.

सध्या कोरोना व्हायरसची माहिती मिळवण्यासाठी रिअल टाइम पीसीआर टेस्ट (RT-PCR Test) केली जाते. यात लोकांचं स्वॅब सॅम्पल म्हणजे लाळेचं सॅम्पल घेतलं जातं जे आरएनएवर आधारित असतं. म्हणजे टेस्टमधून रूग्णाच्या शरीरात व्हायरसचे आरएनए जीनोमचे पुरावे शोधले जातात.

जर रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर होऊ शकतं की, तो रूग्ण कोविड-19 चा रूग्ण असेल. अशात त्यांना घरातच आयसोलेशन ठेवण्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तेच जर निगेटिव्ह आली तर त्या व्यक्तीची रिअल टाइम पीसीआर टेस्ट केली जाते.

ही टेस्टही पॉझिटिव्ह आली तर रूग्णाला हॉस्पिटल किंवा आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. तर रिअल टाइम पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर असं मानलं जातं की, त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही.

जर व्यक्तीची पीसीआर टेस्ट होऊ शकली नसेल तर त्या व्यक्तीला होम क्वारंटाईन ठेवलं जातं आणि 10 दिवसांनी पुन्हा अॅंटीबॉडी टेस्ट केली जाते.

म्हणजे दोन्ही केसमध्ये हे पूर्णपणे कन्फर्म नसतं की, व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही. कन्फर्म रिपोर्टसाठी रिअल टाइम पीसीआर टेस्टच करावी लागते. पण हे माहीत पडतं की, व्यक्तीचं शरीर कोविड-19 सोबत लढण्यासाठी अॅंटीबॉडी तयार करत आहे की नाही.

रिअल टाइम पीसीआरमध्ये रूग्ण ठीक झाल्यावर आरएनए जीनोमची माहिती मिळत नाही. ज्यामुळे त्या व्यक्तीला आधी संक्रमण होतं की नाही हेही माहीत पडत नाही. तेच रॅपिड टेस्टमध्ये रूग्ण बरा झाल्यावर काही दिवसांपर्यंत हे माहीत पडू शकतं की, ती व्यक्ती संक्रमित होती की नाही. तसेच याचे रिझल्टही लवकर मिळतात.