CoronaVirus : कोरोनाचे इन्फेक्शन झाल्यानंतर सुरूवातीचे ९ दिवस कसे असतात, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:48 PM2020-04-12T17:48:50+5:302020-04-12T18:10:41+5:30

कोरोना व्हायरसची लागण होत असलेल्यांची तसंच मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आतापर्यंत देशातील ३६४ जिल्ह्यात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले असून, चिंतेची बाब म्हणजे केवळ चार दिवसात ८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे.

लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून आतापर्यंत सुमारे २८९ जिल्ह्यांत कोरोनाचा फैलाव झाला आहे. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सुरुवातीपासून आतापर्यंत ८ हजार ३५६ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 273 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं. तेव्हा शरीरावर कसा परिणा होतो. याबाबत सांगणार आहोत.

कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंत पहिल्या १ ते २ दिवसात घसा खवखवणं, सर्दी, खोकल्याचा त्रास, उलटी होणं, अशी लक्षणं दिसतात. यात रुग्ण खाऊ पिऊ शकतो. लक्षण जास्त तीव्र नसतात.

चौथ्या दिवशी घसा खवखवण्याचा त्रास वाढतो, आवाज जड झाल्यासारखा वाटतो. शरीराचं तापमान वाढतं. खायची प्यायची इच्छा होत नाही.

पाचव्या दिवशी हालचाल करण्यासाठी त्रास होतो. तापमान जास्त वाढत जातं. अंगदुखी, सांधेदुखीची समस्या उद्भवते.

सहाव्या दिवशी उलट्या होतात. जीवघाबराघुबरा होतो, थकल्यासारखं वाटतं. श्वास घ्यायला त्रास होतो.

सातव्या दिवशी शरीराचं तापमान मागील २ ते ३ दिवसांपेक्षा जास्त वाढलेलं असतं. अंगदुखी, सुका खोकला वाढतो.

आठव्या दिवशी श्वास घेता येत नाही छाती जड झाल्यासारखी वाटते. सांधेदुखीच्या वेदना असहय्य होतात.

नवव्या दिवशी शरीर योग्यप्रकारे कार्य करत नाही. कारण शारीरिक त्रास वाढलेला असतो. त्यामुळे श्वास सुद्धा घ्यायला त्रास होतो. तुम्हाला जर अशी लक्षणं जाणवत असतील तर जास्त वेळ वाट न पाहता. २ ते ३ दिवस आजारी असल्यानंतर लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.