Coronavirus: कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा क्रम संशोधकांनी शोधला; डॉक्टरांना मिळणार मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 02:46 PM2020-08-16T14:46:59+5:302020-08-16T14:50:34+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देश सध्या संकटात आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वैज्ञानिक कोरोना लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.

याच दरम्यान अमेरिकन संशोधकांनी माणसांमध्ये कोविड -१९ च्या संभाव्य लक्षणांचे अनुक्रम डीकोड केले आहेत. त्याअंतर्गत कोरोनाला संसर्ग झाल्यावर प्रथम ताप, त्यानंतर खोकला, स्नायू दुखणे आणि नंतर मळमळ किंवा उलट्या होणे, अतिसार सुरू होणे ही लक्षणे दिसतात.

कोविड -१९ च्या लक्षणांचा क्रम जाणून घेतल्यास रूग्णांना त्वरित वैद्यकीय मदत मिळू शकते किंवा शक्य तितक्या लवकर स्वत:ला सेल्फ आयसोलेशन निर्णय घेण्यासाठी मदत मिळू शकते.

फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लक्षणांचा क्रम ओळखून डॉक्टरांना रूग्णांवर उपचारांची योजना बनविता येते आणि कदाचित लवकरात लवकर रोगावर नियंत्रण मिळण्यास मदत मिळेल.

कोविड -१९ या संसर्गाची लक्षणे असणार्‍या फ्लूसारख्या आजाराचे चक्र आपण कधी पार करत आहोत हे जाणून घेण्यासाठी हा क्रम विशेषतः महत्वाचा आहे असे अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन लेखक पीटर कुन यांनी सांगितले.

या संशोधनाचे दुसरे लेखक जोसेफ लार्सन म्हणाले की, कोविड -१९ च्या उपचारांसाठी आता अधिक चांगले पर्याय उपलब्ध आहेत, जे ओळखून रुग्णाला रुग्णालयात दाखल करू शकतो.

ताप आणि खोकल्याचे विविध प्रकार बर्‍याचदा श्वसनाचे विविध आजाराशी जोडलेले असतात. ज्यात मिडल ईस्ट रेस्पीरी सिंड्रोम (मार्स) आणि सार्स यांचा समावेश आहे. तथापि, कोविड -१९ ची गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट्समधील लक्षणे पाहून ओळखले जाऊ शकते.

शास्त्रज्ञांनी लिहिले, वरच्या जठरोगविषयक ट्रॅक (मळमळ / उलट्या) खालच्या गेस्ट्रोइनेस्टाइनल ट्रॅक्ट (अतिसार) आधी होण्यास सुरुवात होते, ही कोविड -१९ ची लक्षण आहे

ही लक्षणे मार्स व सार्सच्या विरोधाभासी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एकत्रित केलेल्या चीनमध्ये कोरोना विषाणूच्या ५५ हजार पेक्षा जास्त रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता संशोधकांनी या संसर्गाच्या लक्षणांच्या अनुक्रमाचा अंदाज वर्तविला आहे.

सध्या जगभरात २ कोटी १६ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ७ लाख ५० हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा २५ लाखांवर पोहचला आहे तर ५० हजारांपर्यंत रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.