Coronavirus : कोणत्या रूग्णांना जास्त काळ त्रास देतोय कोरोना, जाणून घ्या काय-काय होतात समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:54 PM2021-06-17T13:54:57+5:302021-06-17T14:05:53+5:30

गेलबर्ड म्हणाले की, या रिसर्च निष्कर्ष या महत्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकतात. याने लॉंग कोविड रूग्णांना, विमा पॉलिसी घेणाऱ्यांना, ते विकणाऱ्यांना, त्याचे पैसे देणाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना बरीच मदत होईल'.

कोरोनाच्या रूग्णांमधील लक्षणांना जास्तीत जास्त समजून घेण्यासाठी जगभरात रिसर्च केले जात आहेत. एका नव्या रिसर्चमधून सांगण्यात आले आहे की, विना लक्षणे असलेल्या प्रत्येक पाचव्या रूग्णामध्ये लागण झाल्यावर एक महिन्यांपर्यंत लॉंग कोविडची लक्षणे आढळून येत आहेत. म्हणजे या रूग्णांना एक महिन्यानंतरही कोरोनाशी संबंधित काहीना काही समस्या होत आहे. लक्षणे गंभीर नसल्यावर जास्तीत जास्त रूग्ण घरीच आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत.

हा रिसर्च अमेरिकेतील एक एनजीओ फेअर हेल्थने तेथील १९ लाख लोकांकडून क्लेम करण्यात आलेल्य विम्याच्या आधारावर केला. एनजीओचे अध्यक्ष रॉबिन गेलबर्ड म्हणाले की, 'कोविड-१९ ची लक्षणे कमी झाल्यावरही व्हायरस अनेक लोकांना जास्त काळ प्रभावित करत आहे'.

गेलबर्ड म्हणाले की, या रिसर्च निष्कर्ष या महत्वपूर्ण मुद्द्यावर प्रकाश टाकतात. याने लॉंग कोविड रूग्णांना, विमा पॉलिसी घेणाऱ्यांना, ते विकणाऱ्यांना, त्याचे पैसे देणाऱ्यांना आणि वैज्ञानिकांना बरीच मदत होईल'.

लॉंग कोविड रूग्णांमध्ये चार आठवड्यांपेक्षा जास्त धोका राहतो. रिसर्चमध्ये आढळून आलं की, लॉंग कोविडने हैराण सर्वच वयोगटातील लोकांना डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, हाय कोलेस्ट्रॉल, अस्वस्थता, थकवा आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होती.

कोरोनातून बरे झाल्यावर ३० दिवसांनी किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांनी रूग्णांचा मृत्यू होण्याचा धोका ४६ टक्के अधिक होता. ज्यांना या आजाराची माहिती मिळाल्यावर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं होतं आणि बरे झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तेच हॉस्पिटलमद्ये दाखल न होणाऱ्यांमध्ये मृत्यूची संख्या कमी होती.

रिसर्चनुसार, कोरोनाच्या एसिम्टोमॅटिक रूग्णांपैकी १९ टक्के लोकांना उपचाराच्या ३० दिवसांनंतरही लॉंग कोविडची लक्षणे दिसली. लक्षणांसोबत हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची आकडेवारी ५० आणि लक्षणे असूनही हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या २७.५ टक्के होती.

लॉंग कोविडची लक्षणे वयानुसार बघायला मिळतात. जसे की, लहान मुलांमध्ये ही समस्या आतड्यांशी संबंधित आढळून येत. तेच पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये लॉंग कोविडची लक्षणे अधिक आढळून आली. महिलांच्या तुलनेत जास्तीत जास्त पुरूषांना हृदयावर सूजेची समस्या आढळून आली. यासोबतच अनेक लोकांमध्ये चिंता, डिप्रेशन आणि अॅडजस्टमेंट डिसऑर्डर आढळून आली.

लॉंग कोविडला पोस्ट कोविड सिंड्रोम किंवा पोस्ट एक्यूट सीक्वल म्हटलं जातं. आतापर्यंत याच्या कारणांची माहिती मिळू शकली नाही

रिसर्चनुसार, यामागे एक हे कारण असू शकतं की, आजाराच्या सुरूवातीच्या काळात व्हायरस तंत्रिका तंत्राला नुकसान पोहोचवतो. ते फार हळूवार बरं होतं आणि अशा स्थितीत कमी स्तराचा व्हायरस शरीरात कायम राहतो.