खुशखबर! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी; कितपत सुरक्षित ठरणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:47 AM2020-08-26T11:47:21+5:302020-08-26T12:00:16+5:30

कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान अमेरिकेनं नाकाद्वारे दिली जाणारी लस विकसित केली आहे. या लसीचा डोस नाकाद्वारे दिला जाणार आहे.

पूर्वेकडील तज्ज्ञांनी नाकाद्वारे दिली जाणारी लस प्रभावr ठरत असल्याचे मत व्यक्त केलं आहे. कारण कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात तोंडाद्वारे आणि नाकाद्वारे पसरतं. या लसीची उंदरावर करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्याचा तज्ज्ञांनी केला आहे. या लसीबाबत अधिक माहिती तुम्हाला देणार आहेत.

अमेरिकेत विकसित करण्यात आलेल्या लसीची चाचणी उंदरावर करण्यात आली होती. या चाचणीत ही लस इन्फेक्शन रोखण्यासाठी परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आलं. ही लस विकसित करण्यासाठी वॉशिग्टंन युनिव्हरर्सिटी स्कूल ऑफ मेडिसनचे संशोधक सहभागी होते.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस दिल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसंच व्हायरसशी लढत असलेल्या न्यूट्रिलाइजिंग एंटीबॉडीज सुद्धा वाढतात. नाकात आणि श्वसनतंत्रावर याचा परिणाम दिसून येतो.

वॉशिंग्टन युनिव्हरर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे संशोधक मायकल एस डायमंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लस उंदारांमध्ये कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी यशस्वी ठरली आहे.

या लसीचा डोस दिल्यानंतर नाकाच्या वरच्या भागात व्हायरसचा सामना करण्याची क्षमता वाढून कोरोना व्हायरसचा प्रवेश ब्लॉक करता येऊ शकतो.

रिसर्च जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार संशोधकांनी कोरोना संक्रमित उंदरांना लस दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील इम्यून रिस्पॉन्स वाढला होता. ही लस फुफ्फुसांमधील संक्रमण, सुज येणं आणि कोरोना विषाणूंचा प्रसाराची जोखिम वाढण्यापासून वाचवते

या लसीचे एक किंवा दोन डोज पुरेसे होतात. पण उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये व्हायरसचा प्रसार जास्त वाढल्यामुळे अधिक डोज द्यावा लागला होता.

संशोधक मायकल एस डायमंड यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीच्या पहिल्या डोजनं उंदरांमध्ये व्हायरसविरुद्ध एंटीबॉडीजची वाढ होण्यास सुरूवात झाली होती. आतापर्यंत झालेल्या परिक्षणाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले आहेत. ChAd SARS-CoV-2-S या लसीत व्हायरसला मारण्याची क्षमता आहे.

लसीच्या मदतीने उंदरांना कोरोनाच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवण्यात यश आलं. या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानं तज्ज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ही लस दीर्घकाल व्हायरसपासून बचाव करण्यासाठी परिणामकारक ठरू शकते. असंही तज्ज्ञ म्हणाले.