CoronaVirus News : श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धतीने कोरोनावर करता येते मात; नोबेल विजेत्या तज्ज्ञाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 04:33 PM2020-06-24T16:33:18+5:302020-06-24T17:09:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसवर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. याच दरम्यान श्वासोच्छवासाच्या मदतीने कोरोनाला हरवू शकतो अशी दिलासादायक माहिती आता समोर येत आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता चौथ्या स्थानी आला आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 93 लाखांवर गेली आहे. तर 479879 जणांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 4,56,183 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 14,476 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असताना अनेक दिलासादायक घटनाही समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.

कोरोना व्हायरसवर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. याच दरम्यान श्वासोच्छवासाच्या मदतीने कोरोनाला हरवू शकतो अशी दिलासादायक माहिती आता समोर येत आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वासोच्छवास अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामदतीने कोरोना नष्ट होण्यास मदत होऊ शकते असा दावा नोबेले विजेते फार्मोकोलॉजिस्ट लुईस जे इग्नारो यांनी केला आहे.

नाकावाटे श्वास घेऊन नंतर तो तोंडावाटे सोडला तर आपल्या शरीरावर हल्ला केलेल्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं असं लुईस जे इग्नारो यांनी म्हटलं आहे.

द कनव्हर्सेशनमध्ये इग्नारो यांचा हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे. 1998 रोजी त्यांना फिजिओलॉजीसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे. इग्नारो यांनी श्वासोच्छवास आणि कोरोनाचा संबंध सांगितला आहे.

संशोधनानुसार, अशा पद्धतीने श्वास घेतल्याने नाकामध्ये नायट्रिक ऑक्साईड तयार होतं. जे फुफ्फुसामध्ये रक्तप्रवाह वाढवतं आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढवते.

जेव्हा नाकावाटे श्वास घेतला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड थेट फुफ्फुसामध्ये पोहोचतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये कोरोना व्हायरसचे रिप्लिकेशन होत नाहीत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. यामुळे त्या व्यक्तीला खूप फ्रेश वाटतं.

शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड सतत तयार होतं. ते धमन्यांमध्ये खासकरून फुफ्फुसांमध्ये एन्डोथेलियम (Endothelium) तयार करण्यास मदत करतं. हाय ब्लड प्रेशरची समस्याही यामुळे कमी होते.

योग्य पद्धतीने श्वास घेतल्यास शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. एका हिंद वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.