CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 04:22 PM2020-09-12T16:22:35+5:302020-09-12T16:52:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.

जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे, कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन केलं जात आहे. सध्या 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन सुरू आहे. लस विकसित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.

मानवी शरीरातील SARS-CoV-2 ओळखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या शरीरातील पेशींवर ACE-2 रिसेप्टर असतात. जे व्हायरसवर असलेल्या स्पाइक प्रोटीनचे लक्ष्य असतात. व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात.

शरीरात दाखल झाल्यानंतर व्हायरस रेप्लिकेट होतात आणि संसर्ग शरीराच्या इतर भागात पोहचतो. या व्हायरसशी लढण्यासाठी आपल्या शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल असतात. शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणं हे लसीचं काम असतं.

लस विकसित करणारे शास्त्रज्ञ व्हायरसचा वापर करून लस विकसित करत आहेत. त्यासाठी व्हायरसचं इनॅक्टीव्ह व्हर्जनचा वापर केला जात आहे. व्हायरस कमकुवत करण्यासाठी म्युटेशन होईपर्यंत प्राण्यांच्या पेशींद्वारे ही क्रिया सुरू असते.

म्युटेशनमुळे या आजाराचा प्रसार होत नाही. तर व्हायरसला इनॅक्टिव्ह करण्यासाठी फॉर्मलडिहाइड अथवा उच्च तापमानावर ठेवले जाते. त्यामुळे त्याचा संसर्ग होत नाही.

मानवाच्या शरीरात हा व्हायरस सोडला जातो. त्यानंतर मानवी शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल निर्माण होतात. शरीरात घातक व्हायरसचा शिरकाव झाल्यास त्याचा सामना करण्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तयार असते.

व्हायरल वेक्टर लशीसाठी गोवर (measles) अथवा सामान्य सर्दी (adenovirus) निर्माण करणाऱ्या व्हायरसमध्ये जेनेटिकली बदल केले जातात. त्यामुळे शरीरात व्हायरस स्पाइक प्रोटीनची निर्मिती करतात.

हे अतिशय कमकुवत असतात. त्यामुळे शरीरात आजाराचा प्रसार होत नाही. अशा प्रकारची लस अतिशय सुरक्षित समजली जाते आणि प्रभावीपणे रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात.

लसीमध्ये करोना व्हायरसच्या प्रोटीन, विशेषत: स्पाइक प्रोटीन बनवणाऱ्या डीएनए अथवा आरएनए मानवी शरीरांच्या पेशीत दिले जातात. यामुळे रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते.

शरीरात व्हायरल प्रोटीन झाल्यामुळे त्यांना व्हायरस समजून अँटीबॉडी आणि सेल्यूर इम्यून निर्माण केले जातात. ही पद्धत सुरक्षित असली तर आतापर्यंत प्रभावी असल्याची माहिती समोर आलेली नाही.

काही संशोधक करोना व्हायरसच्या प्रोटीनला थेट शरीरात इंजेक्ट करण्याचा मार्ग सुचवतात. अशावेळी प्रोटीन अथवा प्रोटीन शेलच्या तुकड्यांना जे कोरोना व्हायरसच्या बाहेरील भागांसारखे असतात त्यांना इंजेक्ट केले जाते.

शरीरात हे रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचे काम करतात असं म्हटलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या Covaxin बाबत आनंदाची माहिती मिळत आहे. स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे.

माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे.