CoronaVirus News : आता सर्दी झाली तरी नो प्रॉब्लेम! कोरोनापासून दूर राहाल चार हात; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:43 PM2020-06-12T15:43:26+5:302020-06-12T16:10:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, फ्लू या शारीरिक समस्यांची लक्षणं आणि कोरोना व्हायरसची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. मात्र आता याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 75 लाखांच्या वर गेली आहे.

कोरोना व्हायरस वेगाने संपूर्ण जगभरात पसरत आहे. याची लक्षणं सुद्धा खूप सामान्य आहेत. यात रुग्णाला सुरुवातील सर्दी, खोकला, ताप येतो पुढील काही दिवसात श्वास घ्यायलाही त्रास होतो.

कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध किंवा लस मिळालेली नाही. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, फ्लू या शारीरिक समस्यांची लक्षणं आणि कोरोना व्हायरसची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. मात्र आता याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे.

सर्दी कोरोनापासून लोकांना सुरक्षित ठेवू शकते असा दावा कोरोनाच्या संसर्गावर संशोधन करणाऱ्या एका वैज्ञानिकांच्या पथकाने केला आहे. रिसर्चमधून ही माहिती मिळत आहे.

सर्दीमुळे निर्माण होणारी प्रतिकार शक्ती जवळपास 17 वर्षे कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करू शकते असा दावा करण्यात आला आहे. तसेच ज्या व्यक्तींना सर्दी झाली आहे, त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका कमी असल्याचं देखील म्हटलं आहे.

सिंगापूरच्या ड्युक-एनयुएस मेडिकल स्कूलच्या इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. अंतोनियो ब्रेतोलेती यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. त्यांच्या टीमने हा दावा केला आहे.

सिंगापूरच्या ड्युक-एनयुएस मेडिकल स्कूलच्या इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक अंतोनियो ब्रेतोलेती यांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्यात आले. त्यांच्या टीमने हा दावा केला आहे.

सर्दी झाल्यानंतर शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते. ही प्रतिकार शक्ती कोरोनापासून बचाव करण्यासाठी अथवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

संशोधनात सर्दीच्या आजारापासून लढण्यासाठी शरीरात तयार होणाऱ्या टी-सेल्स यादेखील कोरोनाविरोधात प्रभावी ठरत असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

बीटा-कोरोना व्हायरस OC43 आणि HKU1 माणसांमध्ये सर्दी आणि चेस्ट-इन्फेक्शन निर्माण करतात. हे सर्व व्हायरस आणि कोरोना व्हायरस मर्स आणि सार्स यांची जनुकीय संरचना एकसारखी असते. तसेच हे व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतात.

कोरोना व्हायरस सर्दीचा आजार देण्यास 30 टक्के कारणीभूत असतात. त्याशिवाय हे व्हायरस सर्दीसारख्या आजारांशिवाय इतरवेळीही घातक ठरू शकतात.

व्हायरसमुळे होणाऱ्या सर्दीविरोधात टी-सेल्स पेशी सुरक्षा देतात. हे विषाणू शरीरात आल्यानंतर टी-सेल्स सक्रिय होतात आणि त्यांचा प्रभाव कमी करतात अथवा संपुष्टात आणतात.

संशोधकांनी या संशोधनासाठी कोविड-19 च्या आजारावर मात केलेल्या 24 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. तर सार्सच्या आजारातून बरे झालेल्या 23 रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगातील सर्वच देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तब्बल चार लाखांच्या वर पोहोचला आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.