Coronavirus: बरे झाल्यानंतरही १५ महिने आढळतायेत कोरोनाची 'ही' लक्षणं; दुर्लक्ष करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 01:01 PM2022-05-26T13:01:03+5:302022-05-26T13:04:59+5:30

कोरोना व्हायरसचा कहर अद्याप संपलेला नाही. अनेक देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नवी रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भारतात दिवसाला २ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत भर होताना दिसत आहे. ओमायक्रॉनमुळे सब व्हेरिएंट, बीए २, बीए ४ आणि बीए ५ नं दहशत वाढवली आहे. कोरोनाला आता २ वर्ष झाली तरी याबाबत समोर येत असलेले शोध भयंकर आहेत.

अलीकडेच आलेल्या नव्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचे काही लक्षण १५ महिन्यापर्यंत कायम राहू शकतात. दिर्घकाळ राहणाऱ्या लक्षणांना लॉन्ग कोविड लक्षणं म्हणून ओळखली जातात. एनल्स ऑफ क्लिनिकल एँड ट्रांसलेशनल न्यूरोलॉजी जर्नलमध्ये हे प्रकाशित करण्यात आले आहे.

दीर्घकाळ टिकणाऱ्या कोविडच्या लक्षणांपैकी न्यूरोलॉजिकल लक्षणे सामान्य आहेत. चला जाणून घेऊया कोरोनाची अशी कोणती लक्षणे आहेत जी दीड वर्षाच्या कालावधीनंतरही रुग्णांचा पाठलाग सोडत नाही. १५ महिन्यांपर्यंत लक्षणं आहेत.

रिपोर्टनुसार, रुग्ण बरा झाल्यानंतरही अनेक कोरोनाची लक्षणे कायम राहू शकतात. तथापि, मनोविकाराची लक्षणे जास्त काळ टिकतात. या लक्षणांचा समावेश होतो- ब्रेन फोग, सुन्नपणा, मुंग्या येणे, डोकेदुखी, चक्कर येणे धूसर दृष्टी, कानात वाजणे, थकवा यांचा समावेश आहे.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळून आले की, ८५ टक्के रूग्णांनी त्यांच्या तीव्र संसर्गानंतर किमान सहा आठवड्यांनंतर किमान चार न्यूरोलॉजिकल समस्या नोंदवल्या. त्यामुळे लॉन्ग कोविड लक्षणं आढळून आली आहेत.

अभ्यासात असे दिसून आले आहे की, बहुतेक न्यूरोलॉजिकल लक्षणे सरासरी १५ महिन्यांनंतर टिकून राहतात. तर बहुतेक रूग्णांनी त्यांची विचार करण्याची क्षमता आणि थकवा यांमध्ये सुधारणा नोंदवली आहे. ही लक्षणे पूर्णपणे निघून गेली नाहीत आणि त्यांच्या जीवनमानावर परिणाम झाला.

हृदय गती, रक्तदाब भिन्नता आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसह काही लक्षणे कालांतराने वाढतात. चव आणि वास कमी होणे यासारखी इतर लक्षणे आढळली. या लसीने लक्षणे कमी केली नाहीत, परंतु कोरोना विषाणूला आणखी गंभीर होण्यापासून रोखले

कोणताही विषाणूजन्य संसर्ग शरीराच्या इतर भागांवर तसेच मेंदूवर हल्ला करेल. त्यामुळे शरीरात जळजळ होते. परंतु प्रक्रियेत ते मेंदूच्या पेशी आणि न्यूरॉन्सचे नुकसान करते. कोरोना विषाणू दाहक प्रतिसाद वाढवतो हे लक्षात ठेवावं.

कोरोनाने जगभरात मोठे रुप धारण केले आहे. मंकीपॉक्सने देखील १२ देशांमध्ये हजेरी लावल्याने जगभरातील देशांचे धाबे दणाणले आहेत. सौदी अरेबियाने कोरोनाच्या भीतीने भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.