शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२९ वर्षांत बनला ३५ मुलांचा बाप; स्पर्म डोनरनं सांगितला आपला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 10:40 AM

1 / 10
गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या महासाथीनंतर अनेक गोष्टी ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. अनेक नवे व्यवसायही नावारुपाला आले आहेत. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
2 / 10
अमेरिकेतील लॉस एन्जेल्स येथे राहणाऱ्या स्पर्म डोनरनंही आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. केली गार्डी असं त्याचं नाव असून ब्रिटिश टीव्ही स्काय न्यूजला त्यानं आपल्या ऑनलाईन स्पर्म डोनेशनबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
3 / 10
आतापर्यंत स्पर्म डोनेशनमुळे आपण २९ व्या वर्षीच ३५ मुलांचा पिता बनला आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान आपलं काम अधिक वाढलं असल्याचंही त्यानं सांगितलं. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
4 / 10
तसंच या कालावधीत जगबरातून अनेक जण आपल्याशी संपर्क करत आहेत, असंही त्यानं सांगितलं. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
5 / 10
याशिवाय गॉर्डी हा लॉस एन्जेल्समधील एका कंपनीत पार्ट टाईम अकाऊंटंटदेखील आहे. तसंच तो फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून स्पर्म डोनरचंही काम करतो. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
6 / 10
गॉर्डीनं दोन फेसबुक ग्रुप तयार केले आहेत. त्यातील पहिला म्हणजे केवळ अमेरिकेतील लोकांसाठी आहे. तर दुसरा हा जगभरातील अन्य लोकांसाठी आहे. २२ व्या वर्षी आपण हे काम करण्यास सुरू केल्याचंही गॉर्डीनं सांगितलं. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
7 / 10
'मला लोकांची मदत करणं आवडतं. यामुळे मला अनेक ठिकाणी मोफत प्रवासही करता येतो. हे माझ्यासाठी एका अॅडव्हेंचरप्रमाणे आहे,' असं गॉर्डीनं स्काय न्यूजशी बोलताना सांगितलं. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
8 / 10
कोरोना विषाणूच्या महासाथीदरम्यान काम अधिक वाढलं असल्याचंही त्यानं नमूद केलं. (फोटो सौजन्य - फ्रिपिक)
9 / 10
दरम्यान, स्पर्म डोनेशनचा प्रकार कसा असावा हे आपले क्लायंटच ठरवत असल्याचंही गॉर्डीनं मुलाखतीदरम्यान सांगितलं.
10 / 10
स्पर्म डोनेशनच्या मोबदल्यात आपण पैसे घेत नाही. परंतु आपल्या जाण्या येण्याचा खर्च करण्यास आपण सांगतो. मी एका डीलप्रमाणे या गोष्टी करतो. मला मोफत प्रवास करता येतो आणि ज्यांना गरज आहे त्यांना बाळही मिळतं. यामध्ये आम्ही दोघंही सुखी आहोत, असंही त्यानं स्पष्ट केलं.
टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनJara hatkeजरा हटके