छातीत कळ अन् धाप; इस्केमिक हृदयरोगाचे इशारा तर नाही? ही लक्षणे जाणवताच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:03 IST2026-04-13T18:49:58+5:302026-04-13T19:03:49+5:30

भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ३० टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे 'इस्केमिक' हृदयरोगाचा धोका वाढला आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा खंडित झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण होते.

Chest tightness and shortness of breath; Aren't these signs of ischemic heart disease? Be careful if you experience these symptoms

प्रकृतीची काय काळजी घ्याल? : रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा, वजन नियंत्रणात ठेवा, पुरेशी म्हणजे ७-८ तास झोप घ्या आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी योगाभ्यास करा, मिठाचे आणि साखरेचे प्रमाण आहारात कमी ठेवा.

वेळीच या चाचण्या करा : हृदयाच्या ठोक्यांची गती तपासण्यासाठी 'ईसीजी', हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता पाहण्यासाठी. '२-डी इको, शारीरिक श्रमानंतर हृदयावर पडणारा ताण तपासण्यासाठी 'टीएमटी' व रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी. 'लिपीड प्रोफाइल' आहे.

ही लक्षणे जाणवताच सावध व्हा : छातीत मध्यभागी दबाव, जडपणा किंवा कळ येणे, चालताना किंवा जिने चढताना धाप लागणे, डावा हात, जबडा किंवा पाठीत वेदना होणे, अचानक खूप घाम येणे आणि अस्वस्थ वाटणे.

कोणत्या वयात सर्वाधिक धोका ? : पूर्वी हा आजार ५० वर्षांनंतर दिसायचा, मात्र आता ३० ते ४५ वयोगर्टतील तरुणांमध्ये याचे प्रमाण चिंताजनकरीतीने वाढले आहे. कौटुंबिक इतिहास असल्यास हा धोका कोणत्याही वयात उद्भवू शकतो.