शरीरासाठी गुणकारी ठरतं कलिंगडाचं साल, फायदे वाचून साल फेकताना १० वेळा विचार कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:57 PM2020-05-06T14:57:58+5:302020-05-06T15:14:47+5:30

सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे बाजारात कलिंगड दिसायला सुरूवात झाली आहे. कलिंगडाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. व्हिटामीन ए आणि व्हिटामीन सी यांत अधिक असल्यामुळे आपल्या शरिराला अधिक फायदा होतो. व्हिटॅमिन 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. इतकेच नाही तर कलिंगडामध्ये ९० टक्के इतके पाण्याचे प्रमाण असते.

कलिंगडाचे नियमित सेवन केल्यास आपल्या शरिरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. पचनतंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी कलिंगड उपयोगी फळ आहे. त्यासोबतच कलिंगडाचं साल सुद्धा शरीराला आजारांपासून लांब ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला कलिंगडाच्या सालीचे फायदे सांगणार आहोत

कलिंगडाच्या सालीमुळे हृदय चांगलं राहतं. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसारण व्यवस्थित होतं. याशिवाय कलिंगडाच्या सालीत असलेले सिट्रुललाइन रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे हार्ट फेल्‍योर, कोरोनरी आर्टरी डिजीजचा धोका कमी होतो.

कलिंगडाच्या सालीत पोटॅशियम असतं. त्यामुळे किडनीसाठी लाभदायक ठरतं. कलिंगडाच्या सालीत मुत्रवर्धक आणि हायड्रेटिंग गुण असतात. युटीआयची समस्या निर्माण झाल्यास तुम्ही एक ग्लास कलिंगडाच्या सालीचा रस प्यायला हवा.

कलिंगडात लायकोपीन असल्यामुळे इंफ्लमेशन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. कलिंगडाची साल खाल्ल्याने त्वचेवरील इंफ्लामेशनमुळे आलेल्या गाठी आण वेदना कमी होण्यास मदत होते. सूज कमी करण्यासाठी कलिंगडाची साल आणि एवॅकॅडो तसंच केळं एकत्र करून मास्क तयार करा आणि आपल्या त्वचेवर लावा.

कलिंगडाच्या सालीत मॅग्नेशियम असतं. त्यामुळे चांगली झोप येते. झोपेत बडबडणे, अनिद्रा यांसारख्या समस्या कलिंगडाच्या सालीच्या सेवनाने दूर होतात.

कलिंगड खाल्यानंतर कलिंगडाच्या सालीचा वापर कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर जाणून घ्या कलिंगडाच्या सालीचा वापर कसा करायचा. कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढून पांढरा रंग असलेल्या भागाचा वापर करून तुम्ही लोणंचं किंवा जॅम तयार करू शकता

याशिवाय कलिंगडाच्या सालीची भाजी किंवा कढी तुम्ही तयार करू शकता. कलिंगडाच्या सालीचा वापर करण्याबाबत अनेक व्हिडीओ तुम्हाला यु-ट्यूबवर दिसून येतील. यातून तुम्हाला सालीचा वापर करण्याबाबत आयडीया मिळू शकते.