शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बदलणाऱ्या वातावरणामध्ये उत्तम आरोग्यासाठी काही घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 1:06 PM

1 / 7
सध्या वातावरणामध्ये फार बदल घडून येत असून सकाळी आणि रात्री गारवा जाणवतो तर दिवसा प्रचंड उकाडा. पण याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशा वातावरणामध्ये आरोग्याकडे जरासंही दुर्लक्षं केलं तर तुम्ही आजारी पडू शकता. अनेक तज्ज्ञही अनेकदा असाच सल्ला देत असतात की, बदलत्या वातावरणामध्ये सावधान राहण्याची गरज असते. जेणेकरून तुम्ही खोकला, सर्दी आणि ताप यांसारख्या समस्यांपासून दूर राहू शकता. या सीजनमध्ये आजारांपासून बचाव करण्याची गरज असेल किंवा तापापासून बचाव करणं असो... औषधांऐवजी जर घरगुती उपाय ट्राय केले तर ते अधिक परिणामकारक ठरतात आणि त्यांचे काही साइड इफेक्टही नसतात.
2 / 7
लिंबू, दालचीनी आणि मधाचे मिश्रण सर्दी-कफ आणि ताप यांसारख्या समस्यांपासून सुटका देण्यासाठी मदत करतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ज्यावेळी लिंबाला दालचिनी आणि मधासोबत एकत्र करण्यात येतं. त्यावेळी खोकल्यापासून सुटका करण्यासाठी मदत करतं. हे तयार करण्यासाठी अर्धा चमचा मधामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि चिमूटभर दालचिनीची पूड एकत्र करा. या मिश्रणाचे दिवसातून 2 वेळा सेवन करा.
3 / 7
औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असलेल्या तुळशीच्या पानांसोबत जेव्हा वेलची, दालचिनी आणि मध एकत्र करण्यात येतं, त्यावेळी खकला, सर्दी आणि तापापासून सुटका करण्यासाठी मदत होते. हा काढा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये 1 लवंग, 1 मोठी वेलची, थोडीशी दालचिनी, थोडसं लेमनग्रास आणि 5 ते 7 तुळशीची पानं एकत्र करा. आता हे पाणी 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवर उकळा. गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. काढा तयार आहे. यामध्ये थोडीशी मध एकत्र करू प्या.
4 / 7
हळद असलेलं दूध सर्दी-खोकल्यावर उत्तम पर्याय ठरतं. कारण हळदीमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात जे बॅक्टेरियापासून सुटका करण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी हे प्यायल्याने सर्दी-खोकला आणि ताप बरा होण्यासाठी मदत होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टरियल आणि अ‍ॅन्टीवायरल गुणधर्म असतात जे इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात. यामधील अ‍ॅन्टी इफ्लेमेटरी गुणधर्म सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात.
5 / 7
गरम पाण्यामध्ये चिमूटभर मीठ एकत्र करून गुळण्या केल्याने सर्दी-खोकला दूर होण्यास मदत होते. यामुळे घशाची खवखव दूर होते आणि आराम मिळतो.
6 / 7
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-सी आढळून येतं. जे रक्त प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.
7 / 7
आलं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून त्यामध्ये मीठ एकत्र करून याचे सेवन करा. यामुळे गळ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होइल आणि मीठामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स