डोळ्यांची साथ आली... गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:24 PM2023-08-17T15:24:46+5:302023-08-17T15:35:22+5:30

राज्यात डोळ्याच्या आजाराची साथ पसरली आहे. मागील काही दिवसांपासून डोळे येण्याच्या या आजारामुळे अनेक नागरिक बेजार झाले आहेत.

राज्यात डोळ्याच्या आजाराची साथ पसरली आहे. मागील काही दिवसांपासून डोळे येण्याच्या या आजारामुळे अनेक नागरिक बेजार झाले आहेत.

दरम्यान, आजारामुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असून गॉगलची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गॉगल्सचे दर १५ ते २० टक्के दराने वाढले आहेत.

डोळ्याच्या साथीच्या काळात 'गोरे गोरे मुखडे पे, काला काला चष्मा' सध्या डोळ्यांची सुरक्षा करीत आहे.

सध्या संपूर्ण राज्यभरात डोळे येण्याची साथ सुरू आहे. ज्येष्ठांपासून लहानांपर्यंत सर्वांना या आजाराचा सामना करावा लागत आहे.

मोठ्या प्रमाणात डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याने संरक्षण म्हणून काळा चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये काळ्या गॉगल्सची विक्री वाढल्याने गॉगलचे दरही वाढले आहेत.

चष्मे विक्रेत्यांकडून पूर्वी एक महिना, पंधरा दिवसांतून एकदा मालाची ऑर्डर दिली जात होती. आता आठवड्यातून एक ते दोनवेळा ऑर्डर द्यावी लागत आहे. जिल्ह्यात नागपूर, मुंबई आदी ठिकाणांहून चष्म्यांचा पुरवठा होत आहे.

अशी घ्या काळजी संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टॉवेल वापरणे टाळावे. हात स्वच्छ धुवावेत. डोळ्यांना सहजासहजी सारखा हात लावू नये.

काय आहेत काळ्या चष्म्याचे फायदे डोळ्यांचा संसर्ग पसरू नये यासाठी काळा चष्मा आवश्यक आहे. फोटो फोबियामुळे होणाच्या समस्या टाळण्यासाठी काळा गॉगल लावावा. डोळे आल्यानंतर हवेपासून संरक्षण व्हावे, यासाठी सेफ्टी गॉगल वापरावा.