रोनाल्डोचे दोन गोल, माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम १६ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 10:39 PM2017-11-22T22:39:24+5:302017-11-22T22:57:31+5:30

पॅरिस : ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या जोरावर रियाल माद्रिदने एपोएलचा ६-० ने पराभव केला. 

त्यामुळे आता रियाल माद्रिद चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे़.

अन्य एका सामन्यात लिव्हरपूलने तीन गोलची आघाडी घेतल्यानंतर सेविलाविरुद्ध ड्रॉ खेळला. 

जिनेदीन जिदान यांच्या संघाने गत सामन्यामध्ये टॉटेनहम हाट्सपरकडून पराभूत झाल्यानंतर पुनरागमन करताना सायप्रसमध्ये एपोएलवर मात केली़. 

पाच वेळचा चॅम्पियन लिव्हरपूलने तीन गोलची आघाडी घेतल्यानंतर सेविलाविरुद्ध ३-३ असा ड्रॉ खेळला़ गट ईमध्ये रशियन चॅम्पियन स्पार्तक मास्कोने मारिबोरविरुद्धची लढत १-१ ने बरोबरीत सोडविली.