दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 13:24 IST2020-07-14T13:22:16+5:302020-07-14T13:24:34+5:30

इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू आणि डेव्हिड बेकहॅम आणि गायिका व स्टारलिस्ट व्हिक्टोरिया बेकहॅम यांच्या मोठ्या मुलानं नुकताच साखरपुडा केला.
ब्रुकलिन बेकहॅमने गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री निकोला पेल्टजसोबत साखरपुडा केला.
ब्रुकलिन आणि निकोला यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले.
दोन आठवड्यांपूर्वी हा साखरपुडा केल्याची माहिती, 21 वर्षीय ब्रुकलिननं दिली.
या दोघांनी एक रोमँटिक फोटो पोस्ट केला. त्यावर ब्रुकलिननं लिहिलं की, मी दोन आठवड्यांपूर्वी निकोलाला लग्नाची मागणी घातली आणि तिनं होकार दिला.