कोण आहे Georgina Rodríguez?, एकेकाळची सेल्स असिस्टन्स अन् आज Cristiano Ronaldoनं दिलं तिला भारी गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:15 PM2022-01-28T17:15:39+5:302022-01-28T17:19:21+5:30

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर मॉडेल जॉर्जिन रॉड्रीग्जच्या वाढदिवसाचे पोस्टर्स झळकले अन् सगळीकडे तिची चर्चा रंगली.

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर मॉडेल जॉर्जिन रॉड्रीग्जच्या वाढदिवसाचे पोस्टर्स झळकले अन् सगळीकडे तिची चर्चा रंगली. स्पेनच्या जाका शहरातील जॉर्जिना रॉड्रीग्जचा जन्म. जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे.

लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची. जॉर्जिनाच्या वडिलांना अमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी दहा वर्षांचा कारावास झाला होता.

कधीकाळी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची.२०१६मध्ये तिची ओळख जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोशी झाली.

जॉर्जिना ज्या स्टोरमध्ये काम करत होती तिथेच रोनाल्डोसोबत तिची नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले.

नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत..

गुरूवारी जॉर्जिनानं २८वा वाढदिवस साजरा केला. मँचेस्टर युनायटेडचा स्टार रोनाल्डो यानं तिला भारी गिफ्ट दिलं. रोनाल्डोनं जॉर्जिनाला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देताना तिचे फोटो बुर्ज खलिफावर झळकवले.

लवकरच जॉर्जिनाच्या आयुष्यावर आधारीत सीरिज नेटफ्लिक्सवर येणार आहे. रोनाल्डो कुटुंबीयांसह सध्या दुबईतच आहे.