हे आहेत आवळा खाण्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 05:16 PM2018-02-20T17:16:13+5:302018-02-20T17:22:01+5:30

जानेवारी, फेब्रुवारी महिने म्हणजे आवळ्यांचा मोसम. आवळ्यांचे झाड आकाराने लहान व साधारणपणे २० ते ३० फूट उंचीचे असते. आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका असून फायलँथॅसी हे त्याचे कूळ आहे. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो.

आवळ्याची फुले हिरवट पिवळी किंवा गुलाबी रंगाची आणि आकाराने लहान असतात. नर आणि मादी फुलांची रचना एकाच फांदीवर वेगवेगळ्या जागी आढळते. काही दिवसांतच मादी फुलांचे रूपांतर गोल, फिक्कट हिरव्या आवळा फळात झालेले दिसून येते.

चवीने आंबट, तुरट असलेला आवळा स्वयंपाकघरात निरनिराळ्या रूपात हजेरी लावतो.

मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत इ. प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे. आयुर्वेदात याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. उदा. पित्तशामक, केशवर्धक, शक्तिवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.

आवळा हा म्हतारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचणक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे. हजार आजारावर आवळा हे एकच औषध आहे. अबालवृध्दासाठी आवळा हे अतिउत्तम औषध आहे.