Milk: फाटलेल्या दुधापासून केवळ पनीरच नाही तर बनवता येतात हे चविष्ट पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 12:27 AM2022-01-08T00:27:58+5:302022-01-08T00:30:37+5:30

Milk Use: दूध फाटल्यानंतर सर्वसामान्यपणे त्यापासून पनीरच बनवले जाते. मात्र पनीरशिवाय अनेक चविष्ट पदार्थ बनवता येऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का, आज आपण दुधापासून घरात काय काय पदार्थ सहजपणे बनवता येतात हे पाहूया.

दूध फाटल्यानंतर सर्वसामान्यपणे त्यापासून पनीरच बनवले जाते. मात्र पनीरशिवाय अनेक चविष्ट पदार्थ बनवता येऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का, आज आपण दुधापासून घरात काय काय पदार्थ सहजपणे बनवता येतात हे पाहूया.

जर तुम्ही मार्केटप्रमाणे घट्ट दही घरच्या घरी बनवण्यासाठी इच्छुक असाल तर फाटलेल्या दुधाचे घरीच दाट दही बनवा. फाटलेल्या दुधामध्ये थोडेसे दही घाला आणि काही तासांनंतर तुमच्याकडे दाट दही तयार होईल.

खूप कमी लोक चिकनच्या मेरिनेशनमध्ये फाटलेल्या दुधाचा वापर करतात. उल्लेखनीय बाब म्हणजे जर घरामध्ये नॉनव्हेज बनवण्याची तुम्हाला आवड असेल तर फाटलेल्या दुधापासून त्याचे मेरिनेशन करा आणि चिकनची टेस्ट वाढवा.

केकमध्ये फाटलेल्या दुधाचा वापर करून तुम्ही हा केक चांगल्याप्रकारे फुलवू शकता. फाटलेले दूध हे बेकिंग सोड्याचे काम करते. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर अंड्याच्या जागी फाटलेल्या दुधापासून के बनवू शकता.

मिठाईच्या दुकानांमध्येही फाटलेल्या दुधापासूनच कलाकंदसारखी चविष्ट मिठाई तयार केली जाते. जर तुम्हीही घरी कलाकंद बनवण्याचा विचार करत असाल तर ती बनवणे खूप सोपी आहे.

अनेक लोक फाटलेल्या दुधाचे पाणी फेकून देतात. या पाण्यामध्य़े खूप प्रोटिन असतात, हे तुम्हाला माहिती आहे का. त्यामुळे आजच या पाण्याला आपल्या डाएटचा भाग बनवा आणि निरोगी राहा.