शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वजन कमी करायचं असेल तर रोज करा एक कप दुधाचं सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 4:54 PM

1 / 7
भारत हा जगात सर्वात जास्त दुधाचं उत्पादन करणारा देश आहे. पूर्वीपासून दूध आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग राहिलं आहे. दुधाला संपूर्ण आहार मानलं जातं. कारण यात भरपूर कॅलरी, कॅल्शिअम आणि प्रोटीन असतात. हे तत्व आपल्या शरीरासाठी फार हानिकारक असतात. पण सध्या लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत फार बदल बघायला मिळतो. लोक दूध सेवन सोडून वीगन डाएट करत आहेत. पण अशाप्रकारे आहारातून दुधाला दूर करणे योग्य नाही. चला जाणून घेऊ दूध का आपल्या पारंपारिक डाएटचा भाग आहे आणि दूध सेवन करून आपण कशाप्रकारे फिट राहू शकतो. (Image Credit : www.naturalfoodseries.com)
2 / 7
दुधाने भूक भागते - नाश्त्यामध्ये टोस्ट, दोन अंडाच्या पांढरा भाग आणि एक ग्लास दूध यापेक्षा नाश्ता कशाचाच अशू शकत नाही. यातून कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि प्रोटीन मिळतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध कॉर्न फ्लेक्स किंवा ओट्ससोबतही सेवन करू शकता. याने तुम्हाला दिवसभरासाठी एनर्जीही मिळेल आणि तुमचं पोटही भरलं राहील. (Image Credit : Daily Express)
3 / 7
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दूध - शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करायला असेल तर एक ग्लास दूध सर्वात चांगला पर्याय आहे. हा सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि दुसऱ्या सॉफ्ट ड्रिक्सपेक्षा चांगला पर्याय आहे. दुधात सोडियम आणि पोटॅशिअम असतं, जे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतं. (Image Credit : Time Magazine)
4 / 7
शरीरात मेटाबॉलिज्म वाढतं - दुधात फॅट, कॅल्शिअम आणि इतरही काही पोषक पदार्थांचं संतुलित प्रमाण असतं. जे आपल्याला दिवसभर अॅक्टिव ठेवण्यासाठी मदत करतात. याने आपल्याला आवश्यक ऊर्जा मिळते आणि शरारीचं मेटाबॉलिज्मही नियंत्रित राहतं. यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. (image Credit : iDiva.com)
5 / 7
जिममध्ये दूध फायदेशीर - दुधाचं सेवन केल्याने हाडे आणि मांसपेशी मजबूत होतात. याने जिममध्ये आपलं परफॉर्मंन्स चांगलं होतं. जिमनंतर दूध सेवन केल्यावर थकवा दूर होतो, तसेच आवश्यक पोषक तत्वही शरीराला मिळतात. (Image Credit : StyleCaster)
6 / 7
दुधातील फॅटने नुकसान नाही - दुधातील फॅट नुकसानकारक नसतं. याने आपल्या हाडांना लवचिकता मिळते आणि मांसपेशी मजबूत होतात. दुधात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम असतात, ज्यामुळे दात आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहतं.
7 / 7
आहारात असा करा समावेश - आपल्या दिवसभराच्या आवश्यकेतनुसार तुमचा डाएट प्लॅन तयार करा. तुम्हाल जितक्या कॅलरींची गरज असते त्यापेक्षा कमी कॅलरी घेऊ नका. एका कप दूध प्यायल्याने तुम्हाला १५० कॅलरी मिळतात. तर एक कप लो फॅट दुधातून तुम्हाला ८३ कॅलरी मिळतात. (Image Credit : www.verywellhealth.com)
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारmilkदूध