Women's Day 2026 : 'हे' चित्रपट प्रत्येकानं पाहिलेच पाहिजेत, तुमचं आयुष्यच बदलून टाकतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:31 IST2026-03-08T12:01:07+5:302026-03-08T12:31:11+5:30
महिला दिन विशेष: स्वतःच्या अस्तित्वाची ओळख करून देतील 'हे' ५ चित्रपट; प्रत्येक स्त्रीने एकदा तरी पाहावेच!

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, समाजात खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. महिलांचे महत्त्व, त्यांचे अधिकार आणि त्यांची जिद्द अधोरेखित करणारे काही दर्जेदार चित्रपट बॉलिवूडने दिले आहेत. हे चित्रपट केवळ महिलांनीच नाही, तर पुरुषांनीही आवर्जून पाहायला हवेत.

आलिया भटची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट एका अशा तरुणीची कथा आहे, जिला फसवून वेश्याव्यवसायात ढकलले जाते. मात्र, ती तिथल्या संकटांना न डगमगता सामोरी जाते आणि पुढे वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कांसाठी लढते.

दीपिका पादुकोणचा पिकू (Piku) हा चित्रपट आजच्या काळातील स्वतंत्र आणि करिअर-केंद्रित स्त्रीचे प्रतिनिधित्व करतो. या चित्रपटात दीपिकाने तिची ग्लॅमरस प्रतिमा सोडून एका खऱ्या, सामान्य स्त्रीची भूमिका साकारली आहे.

इंग्लिश विंग्लिश (English Vinglish) या चित्रपटात श्रीदेवी यांनी साकारलेली 'शशी' ही एक साधी गृहिणी आहे. इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा स्वतःचा नवरा आणि मुले अनेकदा तिचा अपमान करतात. मात्र, परदेशात जाऊन इंग्रजी शिकून ती जो आत्मविश्वास मिळवते, तो प्रत्येक गृहिणीला स्वतःची ओळख जपण्याची प्रेरणा देतो.

लग्नापूर्वीच होणाऱ्या नवऱ्यानं नकार दिल्यानंतर खचून न जाता एकटीच हनिमूनला जाणाऱ्या 'राणी'ची ही कथा आहे. स्वतःचा स्वाभिमान शोधणे आणि कोणत्याही पुरुषाशिवाय जगणे किती आनंदाचे असू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्वीन (Queen) हा चित्रपट आहे.

यामी गौतम आणि इमरान हाश्मी अभिनित हक (Haq) हा कायदेशीर ड्रामा १९८५ च्या प्रसिद्ध 'शाह बानो' प्रकरणावर आधारित आहे. तिहेरी तलाकनंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि हक्कांसाठी एका महिलेला करावा लागणारा न्यायालयीन संघर्ष या चित्रपटात प्रभावीपणे मांडला आहे.

इम्तियाज अलीचा 'हायवे' (Highway) चित्रपट एका तरुणीच्या स्वतःच्या शोधाच्या प्रवासावर आधारित आहे. आलिया भट्टने वीरा या पात्राची भूमिका साकारली आहे, जी अपहरण झाल्यानंतर स्वातंत्र्य आणि शक्ती मिळवते. या चित्रपटात चित्तथरारक दृश्ये आणि ए.आर. रहमान यांच्या संगीताचा अद्भुत अनुभव मिळतो.

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला 'राझी' हा चित्रपट एका भारतीय गुप्तहेराची कहाणी आहे जी पाकिस्तानात जाऊन देशाच्या भल्यासाठी कार्य करते. विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) हा किरण राव दिग्दर्शित विनोदी चित्रपट आहे. यामध्ये दोन महिलांच्या वेगळ्या जीवनशैलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला IMDb वर ८.४ रेटिंग मिळालं आहे.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला 'मिसेस' (Mrs) चित्रपट मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' चा रिमेक आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा एका गृहिणीची भूमिका साकारते, जी पतीचा त्रास सहन करून घरकाम आणि स्वयंपाक करत आहे. हा चित्रपट घरगुती महिलांच्या संघर्षांवर प्रकाश टाकतो.

















