काय सांगता! ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा 19 व्या वर्षीच झाला होता साखरपुडा, पण नंतर तुटलं 'ते' नातं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:47 IST2021-12-21T13:17:44+5:302021-12-21T13:47:23+5:30

साऊथची सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. अल्लू अर्जुनसोबतचा हा सिनेमा रिलीज होताच सुपरहिट ठरला.( Photo Instagram)
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
2017 मध्ये रश्मिकाने तिचा पहिला चित्रपट 'किराक पार्टी'मधील अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील प्रेम बहरले. (file photo)
दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे यापूर्वीही दोघांनी साखरपुडा केला. पण अचानक एकदिवस त्यांनी आपला साखरपुडा मोडला. (file photo)
सध्या रश्मिका विजय देवरकोंडाला डेट करत असल्याची चर्चा आहे.दोघेही गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सिनेमात एकत्र दिसले होते. त्यांची ऑनस्क्रीम केमिस्ट्री तर लोकांना आवडतेच, सोबतच त्यांची रिअल लाइफ केमिस्ट्रीही नेहमीच चर्चेचा विषय असते. .(Photo Instagram)
'पुष्पा'च्या रिलीजनंतर एकदा पुन्हा गुपचूपपणे रश्मिका तिचा रूमर्ड बॉयफ्रेन्ड विजय देवरकोंडा याला रात्री उशीरा भेटायला गेली होती. तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले. (Photo Instagram)
रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. (Photo Instagram)
तुम्हाला माहित असेलच की, रश्मिका लवकरच बॉलिवूड डेब्यू करतेय. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती स्पाय थ्रिलर ‘मिशन मजनू’ या चित्रपटात झळकणार आहे.