उफ्फ उर्फी! यावेळी उर्फीच्या कपड्यांनी नाही तर लिपस्टिकने वेधलं लक्ष, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 17:22 IST2022-09-20T17:05:52+5:302022-09-20T17:22:48+5:30

Urfi Javed : ‘बिग बॉस ओटीटी’मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद हे नाव सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद कशासाठी ओळखली जाते तर तिच्या चित्रविचित्र कपड्यांसाठी. तिची अतरंगी फॅशन पाहून अनेकदा हैराण व्हायला होतं.

आता मात्र उर्फीने वेगळंच काही केलं. अर्थात त्याचीही चर्चा झालीच. होय, कपड्यांच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करणारी उर्फी अलीकडे डार्क ब्ल्यू रंगाची लिपस्टिक राहून बाहेर पडली.

व्हाईट कलरचा डीप नेक बॅकलेस टॉप, त्यावर व्हाईट स्कर्ट, व्हाईट सँडल आणि निळ्या रंगाने रंगवलेले ओठ हे पाहून सगळेच हैराण झालेत.

लिपस्टिक हायलाईट करण्यासाठी उर्फीने एकदम लाईट मेकअप केला होता. निळ्या रंगाचेच इअररिंग्स आणि निळ्या रंगाची नेलपेन्ट लक्ष वेधून घेत होते.

उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. उर्फी जावेदची चर्चा होते ती तिच्या अतरंगी स्टाईलमुळे.

होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी उर्फी प्लास्टिकचा ड्रेस घालून मिरवते. कधी सेप्टीपिन्सपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते. तर कधी टॉपऐवजी नुसता साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून स्पॉट होते. अगदी पोत्यापासून बनवलेला ड्रेस घालून ती एकापेक्षा एक भारी पोझ देते.

‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली आहे.

ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.