बॉलिवूडचे हे प्रसिद्ध कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात पती-पत्नी, पण अनेकांना माहीत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 11:45 IST2022-02-05T11:40:18+5:302022-02-05T11:45:18+5:30

Unknown Bollywood couples :

Bollywood Couples: बॉलिवूड सिनेमांबाबत लोकांना जवळपास सर्वच गोष्टी माहीत असतात. लोक शाहरूख ते दीपिकापर्यंत सर्वांची माहिती ठेवतात. पण बॉलिवूडमध्ये काही कलाकार असेही आहेत जे लोकप्रिय कलाकार असूनही लोकांना त्यांच्याबाबत फार माहिती नाही. त्यामुळे अशाच काही बॉलिवूड कपल्सची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे कपल्स केवळ पडद्यावरच नाही तर रिअल लाइफ कपल आहेत.

१) मुरली शर्मा - अश्विनी काळसेकर - रोहित शेट्टीचा सिनेमा 'गोलमाल' मधील इन्स्पेक्टर डांडे हा तर सर्वांनाच माहीत असेल. याच सिनेमात वसूली भाईची गर्लफ्रेन्ड बनलेली मुन्नी सर्वांनाच आठवत असेल. या दोन्ही भूमिका करणारे मुरली शर्मा आणि अश्विनी काळसेकर रिअल लाइफमध्ये पती-पत्नी आहेत.

२) मनोज पाहवा-सीमा पाहवा - मनोज पाहवा आणि सीमा पाहवा ही जोडी तुम्ही अनेक सिनेमात पाहिली असेल. हे दिग्गज कलाकार रिअल लाइफमध्येही पती-पत्नी आहेतत. मनोज पाहवा यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात १९८४ मध्ये 'हम लोक' पासून केली होत. नंतर ते ऑफिस ऑफिसमधून लोकप्रिय झाले. तसेच सीमा या सुद्धा 'हम लोग' मालिकेत होत्या.

३) केके मेनन-निवेदिता भट्टाचार्य - बॉलिवूडच्या बेस्ट अभिनेत्यांमध्ये केके मेननचं नाव घेतलं जातं. केके मेननने अनेक गाजलेल्या सिनेमात दमदार भूमिका केल्या आहेत. तर निवेदिता भट्टाचार्य छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. हे दोघेही पती-पत्नी आहे.

४) मेहर विज-मानव विज - सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमातील मुन्नीची आई तुम्हाला आठवत असेल. ही भूमिका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मेहर विज यांनी साकरली होती. त्यांचे पती मानव विज हेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहे. मानव आतापर्यंत 'फिलौरी', 'उडता पंजाब', 'नाव शबाना' आणि 'रंगून' या सिनेमात दिसले आहेत.

५) रसिका दुग्गल-मुकुल चड्ढा - बॉलिवूड अभिनेत्री रसिका दुग्गलला तुम्ही 'मिर्झापूर' सीरिजमध्ये पाहिलं आहे. त्याशिवाय ती अनेक सिनेमा आणि मालिकांमध्येही दिसली आहे. तिचा पती मुकुल चढ्डा हा सुद्धा अनेक मोठ्या सिनेमात आणि वेबससीरिजमध्ये दिसला आहे.

६) संजीव सेठ-लता सबरवाल - संजीव सेठ आणि लता सबरवालला तुम्ही प्रसिद्ध मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये पाहिलं असेल. या सिनेमात पती-पत्नी झालेले संजीव-लता एकमेकांच्या प्रेमात पडते आणि मग त्यांनी लग्न केलं.

७) आर.बाल्की-गौरी शिंदे - आर. बाल्की आणि गौरी शिंदे हे दोघेही बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक आहे. बाल्की यांनी चीनी कम, पा आणि पॅडमॅन, सतरंगी रे सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. तर गौरी शिंदेने इंग्लिश विंग्लिश आणि डिअर जिंदगी सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

८) विधु विनोद चोपड़ा-अनुपमा चोपड़ा - 'मुन्ना भाई MBBS', '3 इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' सारख्या सिनेमांचं निर्माते विधु विनोद चोप्रा यांना सगळेच ओळखतात. त्यांची पत्नी अनुपमा चोप्रा आहे. अनुपमा एंटरटेन्मेंट विश्वातील एक मोठा चेहरा आहे. ती अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेते.