"त्याने मला सेटवर पूर्ण युनिटसमोरच..." टीव्ही अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:53 AM2023-09-12T11:53:50+5:302023-09-12T12:02:47+5:30

अभिनेत्रीला खटकली दिग्दर्शकाची वागणूक

मनोरंजनविश्वात ज्युनिअर आर्टिस्ट असो किंवा मोठे कलाकार अनेकदा त्यांना अपमानाला सामोरं जावं लागतं. कास्टिंग काऊचसारखे प्रकारही घडतात. मनोरंजनविश्व दुरुन कितीही झगमगाटाचं दिसत असलं तरी जवळून पाहिलं तर वास्तविक गोष्टी समोर येतात .

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रती पांडेलाही (Rati Pandey) असाच अनुभव आला आहे. रती बऱ्याच वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. 'मिले जब हम तुम','हिटलर दिदी','बेगुसराय' अशा अनेक मालिकांमधून तिने ओळख मिळवली आहे.

रती पांडेने तिला आलेला एक असा अनुभव सांगितला ज्यामुळे तिचे चाहतेही शॉक झालेत. नुकतंच तिने एका वेबसाईटला मुलाखत दिली. यामध्ये तिने एका मालिकेच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप लावलेत. त्या दिग्दर्शकाने तिला संपूर्ण युनिटसमोर अपमानित केले होते.

मुलाखतीदरम्यान रती म्हणाली,'मी मालिकेचं नाव घेऊन इच्छित नाही पण तेव्हा मी एक पौराणिक मालिका करत होते. अगदी पौराणिक नाही तर ती ऐतिहासिक मालिका होती.

अशा विषयात काम करताना तुम्ही भूमिकेत अगदी बु़डून जाता. मी सुद्धा शुद्ध हिंदी बोलायला सुरुवात केली होती. कारण मला भूमिका अगदी परफेक्ट साकारायची होती.

तेव्हा मालिकेच्या शूटिंगदरम्यानच अचानक मला एक सोशियो ड्रामा करायची ऑफर आली होती. मला तयारीसाठी काहीच वेळ मिळाला नाही. मी एक आठवड्यातच शूटिंगला सुरुवात केली होती. मी स्वत:ला शुद्ध हिंदी बोलण्यापासून थांबवू शकले नाही.

शोच्या दिग्दर्शकाला या भूमिकेसाठी कोणीतरी दुसरीच अभिनेत्री हवी होती. पण त्यांना ती मिळाली नाही. त्यांना मी अजिबातच आवडत नव्हते. चॅनल आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रत्येकाला हे माहित होतं की ती भूमिका मीच साकारु शकेन.

तरी देखील त्या दिग्दर्शकाने मला सेटवर खूप त्रास दिला. ते पूर्णवेळ माईकवरुन माझ्यावर ओरडायचे. मी एखादा डायलॉग म्हटला की ते 'नाही जमत आहे' असं माईकवर ओरडायचे. ते मला परफॉर्मच करु द्यायचे नाहीत. मला एक अभिनेत्री म्हणून स्वत:वर शंका यायला लागली होती. मी घरी जाऊन फक्त हाच विचार करायचे. माझी झोप उडाली होती.

मी अभिनय करणं विसरले आहे का, मला येत नाही का असं मी स्वत:ला विचारायला लागले होते. तो मुद्दामून असं करत होता पण मी हार मानली नाही. मी कधीच उलट उत्तरं दिली नाहीत. पण एक दिवस माझी सहनशक्ती संपली.

मी अभिनय करणं विसरले आहे का, मला येत नाही का असं मी स्वत:ला विचारायला लागले होते. तो मुद्दामून असं करत होता पण मी हार मानली नाही. मी कधीच उलट उत्तरं दिली नाहीत. पण एक दिवस माझी सहनशक्ती संपली.

नंतर मला कळलं की तो अनेक कलाकारांसोबत असंच वागतो. स्वत:ला विसरुन भूमिकेत गेलं पाहिजे असा त्याचा पॅटर्न होता. म्हणून तो असं वागायचा. भलेभले कलाकार त्याला घाबरायचे. पण आम्ही कलाकार आहोत आणि सेटवर आमच्यासाठी कंफर्टेबल वातावरण असलं पाहिजे असं मला वाटतं. मी आभारच मानेल की मला असा अनुभव आला हे माझ्यासाठी शिकण्यासारखंच होतं.