RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी

विराट कोहली, रजत पाटीदार व महिपाल लोम्रोर यांनी छोटेखानी महत्त्वाच्या धावा केल्या म्हणून RCB ची लाज वाचली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 09:13 PM2024-05-22T21:13:44+5:302024-05-22T21:17:58+5:30

whatsapp join usJoin us
RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : RCB's star batter surrender in important match, good bowling by Rajasthan Royals, they need 173 runs to win | RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी

RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सर्व स्टार आज अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली अपयशी ठरले. विराट कोहली, रजत पाटीदार व महिपाल लोम्रोर यांनी छोटेखानी महत्त्वाच्या धावा केल्या म्हणून RCB ची लाज वाचली. दिनेश कार्तिकला नाबाद देण्याचा वादग्रस्त निर्णयाने अनेकांच्या भुवया नक्की उंचावल्या. ट्रेंट बोल्टच्या पहिल्या स्पेलने RR ला चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्यानंतर आर अश्विनने बाजी मारली. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर आज RCB च्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. 

वादग्रस्त निर्णय! RCB चा फलंदाज बाद होता, गावस्करांसह अनेकांचा दावा; अम्पायरने दिले नाबाद

फॅफ ड्यू प्लेसिस ( १७) ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर पाच्या षटकात बाद झाला. विराटने २४ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावा केल्या आणि युझवेंद्र चहलने ही विकेट मिळवली. बोल्टने पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ६ धावा देत १ विकेट मिळवली. ११व्या षटकात रजत पाटीदारने ( ५) अश्विनच्या गोलंदाजीवर झेलची संधी दिली होती, परंतु ध्रुव जुरेलने सोपा झेल टाकला. पण, अश्विनने पुढच्या षटकात कॅमेरून ग्रीन ( २७) व ग्लेन मॅक्सवेल ( ०) यांना सलग चेंडूवर माघारी पाठवून RCB ची अवस्था ४ बाद ९७ अशी केली.  ग्लेन मॅक्सवेलने या संपूर्ण हंगामात निराश केले. त्याने ११ सामन्यांत केवळ ५८ धावा केल्या आहेत. आर अश्विनने त्याच्या ४ षटकांत १९ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. 


५ धावांवर जीवदान मिळालेल्या पाटीदारने RRच्या चहलचा समाचार घेताना एका षटकात १९ धावा चोपल्या. १५व्या षटकात आवेश खानने त्याची विकेट मिळवली. पाटीदार २२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर झेलबाद झाला. पुढच्याच चेंडूवर आवेशने इनस्विंग डिलिव्हरीवर दिनेश कार्तिकला पायचीत केले होते, परंतु DRS मध्ये त्याला नाबाद ठरवल्याने वादाला तोंड फुटलेय. इरफान पठाणनेही टीका केली. पण, कार्तिकला ( ११) पुढच्या षटकात आवेशने बाद केले. त्याच षटकात आणखी एक सेट फलंदाज महिपाल लोम्रोर बाद झाला. त्याने १७ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. बोल्टने ४-०-१६-१ अशी स्पेल टाकली आणि आवेशने ४ षटकांत ४४ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. 

संदीप शर्माच्या शेवटच्या षटकात यशस्वीकडून मिस्ड फिल्ड झाली आणि RCB ला आयत्या चार धावा मिळाल्या. RCB ला ८ बाद  १७२ धावा करता आल्या. 

Web Title: RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : RCB's star batter surrender in important match, good bowling by Rajasthan Royals, they need 173 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.