Triptii Dimri : "मला माझं स्वातंत्र्य..."; बिझनेसमनच्या प्रेमात वेडी झाली तृप्ती डिमरी?; नात्याबद्दल सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:35 IST2025-01-11T15:03:48+5:302025-01-11T15:35:15+5:30
Triptii Dimri : अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्री बिझनेसमन सॅम मर्चंटला डेट करत आहे.
ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या निमित्ताने दोघेही एकत्र सुट्टीवर गेले होते. सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले जे याचा पुरावा होते.
आता तृप्तीने सॅमसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मौन सोडलं आहे. ई-टाईम्सशी बोलताना तृप्ती म्हणाली की, कधीकधी तुमच्या आयुष्यातील अटेंशन तुम्हाला खूप त्रास देतं.
"मी एक सेलिब्रिटी आहे, लोक माझ्या लाईफबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. मला माझं स्वातंत्र्य खूप आवडतं."
"मला ते दिवस आठवतात जेव्हा मी रस्त्यावर कोणताही संकोच न करता आणि कोणतीही काळजी न करता फिरायचे."
"बऱ्याचदा मी सोशल मीडियापासून दूर राहते. मी काहीही पोस्ट करत नाही. जेव्हा मला वाटतं की हो, मी पोस्ट करायला हवे तेव्हाच मी ते करते."
"माझी टीमही मला सांगते की मी हे करू नये. पण समाज माझ्याकडून काय अपेक्षा करतो याचा विचार न करता मी स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक राहू इच्छिते."
"माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी जे काही पोस्ट करते ती माझी इच्छा आहे."
"मी फक्त फुलांचा फोटो शेअर करेन किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण शेअर करेन, मला फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.