बॉलिवूडच्या या सेलिब्रिटींनी कॅन्सरशी दोन हात करत मिळवला मृत्यूवर विजय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 03:04 PM2020-02-04T15:04:13+5:302020-02-05T10:08:18+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये काही बॉलीवूडस्टार्स कॅन्सरच्या लढाईला सामोरे जात आहेत पण कॅन्सरवर मात करून पुन्हा आपण पहिल्यासारखे आयुष्य जगू शकतो, असा विश्वास मात्र आता वाढत चाललाय आणि त्यासाठी पुन्हा सेलिब्रिटीज हेच नवीन संदर्भ ठरत आहेत. आजच्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जाणून घेऊयात अशाच काही कॅन्सरवर मात करणाऱ्या सेलिब्रिटीजबद्दल...

लंडनमध्ये न्यूरोएन्डोक्राईन इरफान खानने कॅन्सरचा उपचार घेतल्यानंतर चाहत्यांसाठी ती एक धक्कादायक माहिती होती परंतु ‘आता या आजारातून तो पूर्णपणे बरा झाला आहे

अभिनेत्री मनिषा कोइरालाला कर्करोगातून मुक्तता मिळून नवे आयुष्य मिळाले. वयाच्या 42 व्या वर्षी, तिला गर्भाशयाच्या कर्करोगाच्या आजाराला झुंझाव लागलं त्याच्यासाठी तिने न्यूयॉर्क येथे उपचार केला . कर्करोगमुक्त झाल्यानंतर मनिषाने अनेकांना तिच्या संघर्षकथेतून प्रेरणा दिली.

अभिनेता-चित्रपट निर्माते राकेश रोशन यांना कॅन्सरचा आजाराला सामोरे जावे लागले. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला होता.

अभिनेत्री लिसा रे सध्या चंदेरी दुनियेतून लांब आहे. कॅन्सरच्या आजाराने मात करणारी लिसा सध्या महिला सबलीकरण, कॅन्सरवरील रुग्ण आणि योगाचा प्रसार यासाठी काम करताना दिसत आहे. "कॅन्सरमुळे मला जीवनाचे महत्त्व समजले. जीवनामध्ये कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे याची शिकवण मला कर्करोगाने दिली," असं लिसा सांगते.

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर २०१८ पासून कॅन्सरशी झूंज देत होते. ऋषी कपूर २०१८ साली सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर कर्करोगाशी झूंज जिंकली आणि ते २०१९ साली सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात परतले.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अमेरिकेत कॅन्सवर उपचार घेतले. ती आता पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाली आहे

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते असणाऱ्या अनुराग बसू यांनाही कर्करोग झाला होता. 'बर्फी', 'लाइफ इन अ मेट्रो', 'गँगस्टर' यासारखे चित्रपट देणाऱ्या अनुराग यांना रक्ताचा कर्गरोग झाला होता

अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप-खुरानाला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. मात्र आता या आजारातून ती पूर्णपणे बरी झाली आहे