सुजलेला डोळा अन् शरीरावर असंख्य जखमा; प्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने केली जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:35 IST2023-03-07T10:26:22+5:302023-03-07T10:35:43+5:30
Anicka vikramman: अनिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अनिका विक्रमन हिची चर्चा रंगली आहे.
आपल्या बोल्डनेस आणि बिंधास्तपणासाठी ओळखली जाणारी अनिका सध्या तिच्या प्रियकरामुळे चर्चेत आली आहे.
अनिकाला तिच्या प्रियकराने बेदम मारहाण केली असून तिच्या संपूर्ण शरीरावर जबर मारहाणीचे व्रण दिसून येत आहेत.
अनिकाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
अनिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिला जबर मारहाण झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
अनिकाने मारहाणीचे फोटो शेअर करत प्रियकर अनूप पिल्लई याच्यावर मारहाणीचे आरोप केले आहेत. "मी अनूप पिल्लई नावाच्या व्यक्तीवर खूप जास्त प्रेम करत होते. मात्र, त्याने मला अशाप्रकारची मारहाण केली आहे. तसंच तो मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. मी त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये आता तक्रार दाखल केली आहे", असं अनिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या फोटोमध्ये अनिकाच्या अंगावर मोठ्या जखमा दिसत असून तिच्या डोळ्यालाही जबर मार लागला आहे.
अनिकाने या फोटोसह बॉयफ्रेंडच्या चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. यात तिचा प्रियकर तिची माफी मागताना दिसत आहे.
अनिका मल्याळम सिनेक्षेत्रात नशीब आजमावत असून तिने विशमकरन (2022), आईकेके (2021) एंगा पट्टन सोथू (2021) या चित्रपटात काम केलं आहे.