PHOTOS : ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पूचे हे फोटो पाहिलेत का? रिअल लाईफमध्ये आहे खूपच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 17:23 IST2022-07-11T17:12:17+5:302022-07-11T17:23:02+5:30
Dnyanada Ramtirthkar : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अप्पू अर्थात ज्ञानदा रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावरचे तिचे फोटो पाहाल तर थक्क व्हाल.

‘ठिपक्यांची रांगोळी’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. एकत्र कुटुंबाचं महत्त्व अधोरेखित करणारी ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेतील कलाकारही घराघरात पोहोचले. तुमची आमची लाडकी अपूर्वा अर्थात अप्पू ही त्यापैकीच एक.
मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही अपूर्वाची भूमिका साकारते आहे. आज ज्ञानदाला अपूर्वा याच नावानं प्रेक्षक ओळखू लागले आहेत.
मालिकेतील हीच अप्पू अर्थात ज्ञानदा रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावरचे तिचे फोटो पाहाल तर थक्क व्हाल.
ज्ञानदा पुणेकर आहे कारण तिचा जन्म 26 जून 1995 ला पुण्यात झाला आहे. ज्ञानदाचं शिक्षण पी. ई. एस. मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, शिवाजी नगर, पुणे येथे झालं आहे.
महाविद्यालयीन शिक्षण तिने पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, येथे पूर्ण केलं आहे.
सुरूवातीला थिएटर आर्टिस्ट म्हणून तिने काम करण्यास सुरूवात केली. 2016 मध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली आणि तेथूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली.
‘सख्या रे’ ही तिची पहिली मालिका. यामध्ये तिने वैदेही ही भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना तिची ही भूमिका खूप आवडली व तिच्या भूमिकेचं कौतुक झालं.
जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावे, ईअर डाऊन यासारख्या मालिकेंमध्ये तिने काम केलं आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.
मराठीशिवाय स्टार प्लस या वाहिनीवरील ‘शादी मुबारक’ या हिंदी मालिकेतही तिने काम केलं आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ज्ञानदा नेहमीच तिच्या नवनवीन लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
2020 मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत तिने पाऊल ठेवलं. ‘धुरळा’मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, सिध्दार्थ जाधव, अलका कुबल यासारख्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारांसोबत तिने काम केलं.