3 Idiots मधला 'मिलीमीटर' आठवतोय का? आता झालाय भलताच हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 08:00 AM2022-01-27T08:00:00+5:302022-01-27T08:00:00+5:30

3 idiots: 3 Idiots या चित्रपटात बालकलाकार राहुल कुमार याने मिलीमीटरची भूमिका साकारली होती.

आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या 3 Idiots हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात असेल.

२००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. केवळ ५५ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ४६० कोटींची कमाई केली होती.

आजही प्रेक्षक रँचो, फरहान आणि राजू यांच्या मैत्रीची आठवण काढतात. परंतु, यांच्यासोबतच चित्रपटातील आणखीही काही भूमिका गाजल्या.

वायरस,चतुर, मिलीमीटर, हिटलर आणि मदर टेरेसा हे कॅरेक्टरही लोकप्रिय झाले. त्यामुळेच या चित्रपटातील मिलीमीटर सध्या काय करतो हे जाणून घेऊयात.

मिलीटमीटर बॉइज हॉस्टेलमध्ये लॉन्ड्री बॉय म्हणून काम करायचा. परंतु, हॉस्टेलमध्ये त्याचं प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असायचं. त्यामुळे दुबे जींपासून चतुरपर्यंत प्रत्येकाचं सिक्रेट त्याला माहित असायचं.

3 Idiots या चित्रपटात बालकलाकार राहुल कुमार याने मिलीमीटरची भूमिका साकारली होती.

राहुल कुमारचा जन्म ९ सप्टेंबर १९९५ रोजी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झाला. गेल्या १८ वर्षांपासून तो कलाविश्वात सक्रीयपणे कार्यरत आहे.

राहुलने वयाच्या ३ वर्षापासून नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००५ मध्ये तो द ब्लू अंब्रेला चित्रपटाच्या माध्यमातून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर आला.

राहुल २००६ मध्ये ओमकारा चित्रपटातही झळकला आहे. यात त्याने सैफ अली खानच्या लेकाची गोलूची भूमिका केली आहे. त्यानंतर २००९ मध्ये तो 3 Idiots मध्ये झळकला.

'3 Idiots' नंतर तो 'जीना है तो ठोक डाल' या चित्रपटात झळकला. त्यानंतर 'धर्मक्षेत्र', 'फिर भी न माने...बदतमीज़ दिल' , 'नीली छतरी वाले' या मालिकांमध्ये झळकला.

'Bandish Bandits' या सीरिजमध्येही तो झळकला आहे.