"मला खरं प्रेम हवंय, पुढच्या ५ वर्षात लग्न करून..."; २२ वर्षीय लोकप्रिय अभिनेत्रीने केलंय प्लॅनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:47 IST2025-05-30T15:41:56+5:302025-05-30T15:47:03+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीला पुढच्या ५ वर्षात लग्न करायचं आहे.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रीम शेखला पुढच्या ५ वर्षात लग्न करायचं आहे. पण जर असं नाही झालं तर तिने एक मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं आहे. भारती सिंहच्या चॅट शोमध्ये तिने असं म्हटलं आहे.

"मी 'ओल्ड स्कूल' आहे, विशेषतः प्रेमाच्या बाबतीत. मला वाटत नाही की २२ व्या वर्षी कोणी म्हणत असेल की, जर चांगला मुलगा असेल तर मला सांगा. पण मी तसंच म्हणते"

"जर कोणी मला विचारलं की, पुढच्या ५ वर्षात तुला काय करायचं आहे? तर मी म्हणेन की लग्न करून मला सेटल व्हायचं आहे."

"मी डेटिंगच्या नादात पडत नाही कारण मला माहित आहे की ते किती वेदनादायक असू शकतं. मला खरं प्रेम हवं आहे" असं रीमने सांगितलं.

"मी ज्याला डेट करेन त्याच्याशी मी लग्न करेन असं नाही. पण तो असा व्यक्ती असेल ज्याचं माईंडसेट माझ्यासारखच असेल. त्यालाही सेटल व्हायचं असेल आणि टाईमपास करायचा नसेल."

"मी अरेंज्ड मॅरेजसाठीही तयार आहे. माझ्या आयुष्यात एक अशी फेज होती जेव्हा मी कोणाशी तरी खूप अ‍ॅटेच्ड होते, हे जवळपास ४ वर्षांआधीच आहे."

"फक्त ६ महिने बोलल्यानंतर आम्हाला समजलं की याचं काहीच होणार नाही. म्हणूनच आम्ही वेगळे झालो. पण प्रेम यशस्वी न झाल्याने ते कायम मनात राहिलं आहे."

"माझ्या आईला सर्व काही माहित आहे. जरी मी कोणाला भेटायला गेलो तरी मी तिला जाण्यापूर्वी सांगते. मी डेटिंग करणारी व्यक्ती नाही आणि मला घाईही नाही."

"५ वर्षांत लग्न कराण्यासाठी मी तयार आहे. जर तसं झालं नाही तर मी एक लहान मुलगी दत्तक घेईन आणि माझं आयुष्य जगेन."

"मी माझ्या आईसोबत राहते. ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. मला लवकरच लग्न करायचं आहे जेणेकरून माझं मूल माझ्या आईसोबत राहू शकेल" असं देखील रीम शेखने म्हटलं आहे.