'रात्रीस खेळ चाले'मधला पांडू कुठे गायब झाला? आता करतो 'हे' काम, तुम्हाला माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:32 IST2026-02-15T16:28:18+5:302026-02-15T16:32:53+5:30
'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर पांडू कुठेच दिसला नाही. मग तो कुठे गायब झाला? आता तो काय करतो? हे तुम्हाला माहितीये का?

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली.

कोकणातील नाईक वाड्याची हॉरर गोष्ट सांगणारी 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता याबरोबरच पांडूचं पात्रही प्रचंड गाजलं होतं. पांडूच्या "विसरलंय"ने प्रेक्षकांना वेड लावलं होतं.

पण 'रात्रीस खेळ चाले' मालिकेनंतर पांडू कुठेच दिसला नाही. मग तो कुठे गायब झाला? आता तो काय करतो? हे तुम्हाला माहितीये का?

'रात्रीस खेळ चाले' मालिकेत पांडूची भूमिका अभिनेता प्रल्हाद कुडतरकर याने साकारली होती.

या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली होती. पण, आता प्रल्हाद अभिनय करताना दिसत नाही.

खरं तर पडद्यावर प्रल्हाद दिसत नसला तरी तो कलाविश्वात सक्रिय आहे. प्रल्हाद अभिनेता असण्यासोबतच एक लेखकही आहे.

अनेक मालिकांच्या संवाद लेखनाची जबाबदारी त्याने पेलली आहे. सध्या तो तारिणी मालिकेचं संवाद लेखन करतो.

'कुर्ला टू वेंगुर्ला' सिनेमातही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. प्रल्हादचं लग्न झालं असून तो पत्नीसोबतचे फोटो शेअर करत असतो.

















