"तो मला जबरदस्तीने खेचत जंगलात घेऊन गेला, मी किंचाळत होते आणि लोक बघत राहिले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:24 IST2024-12-29T12:14:21+5:302024-12-29T12:24:57+5:30

गावाला राहत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

'अगले जनम मोहे बिटिया ना कीजो' हा टीव्हीवरचा एक टॉप शो होता. या मालिकेतील अभिनेत्री रतन राजपूतने आपल्या अभिनयाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आणि ती लोकप्रिय झाली.

रतन राजपूतला ही सीरियल संपल्यानंतर कोणतं दुसरं काम मिळालं नाही. त्यामुळे ती आपल्या गावाला शिफ्ट झाली.

गावाला राहत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने तिला जबरदस्तीने खेचत जंगलात नेलं आणि तिचं तोंड दाबलं. ती त्यावेळी खूप किंचाळत राहिली.

मंडी हाऊसमध्ये एक्टिंगच्या क्लासला जात असताना तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. एक जण तिचा पाठलाग करत होता आणि नंतर त्याने तिला मागून येऊन पकडलं.

"हात पकडला आणि मला जंगलात घेऊन जात होता. तुला फोन देतो असं सांगत होता. मी याच्यापासून वाचेन की नाही असा प्रश्न मला पडला. मी किंचाळत होते आणि लोक पाहत राहिले."

"एका विद्यार्थ्याने त्यावेळी माझी मदत केली आणि मला सुखरुप घरी पोहोचवलं. माझ्यासोबत असं घडल्याने मी घाबरली होती" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

रतन राजपूतने महाभारतमध्ये देखील काम केलं आहे. आता ती इंडस्ट्रीपासून दूर असून आपल्या गावी राहत आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री एक्टिव्ह असून ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.