भगरे गुरुजींची लेक आहे लोकप्रिय अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केले ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:35 IST2023-04-21T17:30:25+5:302023-04-21T17:35:42+5:30

Anagha bhagare: भगरे गुरुजींची लेक लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम करत आहे.

'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेले गुरुजी म्हणजे अतुलशास्त्री भगरे गुरुजी.

आपल्या ज्योतिषशास्त्रामुळे भगरे गुरुजी यांनी मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

भगरे गुरुजींप्रमाणेच त्यांची लेकीदेखील तितकीच लोकप्रिय आहे.

भगरे गुरुजींची लेक लोकप्रिय अभिनेत्री असून ती सध्या रंग माझा वेगळा या मालिकेत काम करत आहे.

अनघा असं भगरे गुरुजींच्या लेकीचं नाव असून ती रंग माझा वेगळा या मालिकेत श्वेताची भूमिका साकारत आहे.

अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे.

तिने ‘अनन्या’या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती.

अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच अनघाने केलेलं फोटोशूट चर्चेत येत आहे.